Maharashtra Rain | महाराष्ट्राच्या हवामानाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. राज्यामध्ये येत्या काळात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. उत्तर भारतामध्ये तापमानात किमान चढ-उतार सुरूच आहे. राज्यातील काही भागांमध्ये सकाळी थंडीची चाहूल वाढू लागली आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे.
विदर्भामधील तीन जिल्ह्यांना हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागांनी दिलेला आहे. भंडारा , गोंदिया, चंद्रपूर तसेच नागपूर या चार जिल्ह्यांना हवामान विभागाने हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काही तासांमध्ये चार जिल्ह्यांमध्ये विजांच्या आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर राज्याचे इतर भागांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज दिला आहे.
तर उत्तर भारतातील काही भागांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असून पंजाब हरियाणा पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर राजस्थानच्या बहुतांश किमान 8 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअस दरम्यान होते.
तसेच पंजाब मधील अमृतसर येथे देशातील सर्वात कमी पाच पॉईंट 5°c तापमानाचे नोंद झालेली आहे .तर आग्नेय उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशातील काही ठिकाणी गारपीट झालेली आहे तर देशाच्या काही भागांमध्ये हलका पाऊस देखील झाला आहे.