Magel Tyala Solar Pump: राज्य सरकार आणि केंद्र सरकार अंतर्गत मागील त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देण्यात येत आहेत. या योजनेच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांकडे सोलर पंप देण्यात आले आहेत. मात्र अजून देखील मंजुरीच्या प्रतिशत अनेक शेतकरी आहेत. काहींच्या मते सोलरचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पंप मिळणार का नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून आज आपण या लेखात सोलरचा कोटा पूर्ण झाला आहे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | मागेल त्याला कृषी पंप योजनेतील वेंडरची निवड कशी करावी? जाणून घ्या सविस्तर माहिती
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेती काम सोलार कृषी पंप दिले जात आहेत. या अंतर्गत साडेदहा लाख पंप शेतकऱ्यांना स्थापित करण्याचे उद्दिष्ट घेण्यात आलेले आहे. साधारण मार्च 2017 पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा विज्ञानाच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. महावितरणाच्या माध्यमातून मार्च 2025 पर्यंत दीड लाख सोलार पंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. Magel Tyala Solar Pump
राज्यात जवळपास अडीच लाख सोलार पंपाचा कोटा कुसुम योजनेच्या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या अंतर्गत पूर्वीचे काही पंप आणि आता नवीन एक लाख 80 हजार कृषी पंप असा मिळून तो कोटा देण्यात आला होता. एकंदरीत राज्य शासनाला किंवा महावितरणाला मोठा कोटा देण्यात आला आहे. त्यांचे सेंट्रलाइज टेंडर निघाल्यानंतर त्यानंतर कंपन्या उपलब्ध होतात. जरी मार्चपर्यंत उद्दिष्ट पूर्ण झालेले असले तरी या योजनेअंतर्गत जे काही उद्दिष्ट ठेवण्यात आलेले की उद्दिष्ट साडेदहा लाख पंपाचे आहे.
हे पण वाचा | दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! राज्य शालेय शिक्षण मंडळाने घेतला मोठा निर्णय?
मागेल त्याला सोलार कृषी पंप योजनेच्या अंतर्गत कोटा हा संपलेला नाही. एका टप्प्याची प्रक्रिया पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याची सुरुवात लवकरच होणार आहे. यापूर्वी अटल सोलार असेल यात अनेक शेतकरी पात्र झालेल्या आहेत. त्यामध्ये टप्पा एक होता त्याचप्रमाणे टप्पा दोन देखील आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना आली आहे. यामधील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे पहिल्या टप्प्यामध्ये 25000 पंप देण्यात आले आहेत तर दुसऱ्या टप्पा आणि तिसरा टप्पा एकत्रित 75000 देण्यात येणार आहेत. त्यानंतर कुसुम सोलार योजना आली या योजनेत फक्त 2750 पंपापासून सुरुवात झाली होती. यानंतर यात हळूहळू टप्पे वाढत जाऊन आता साडेदहा लाख पंपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
हे पण वाचा | रेशन कार्ड मधून या नागरिकांचे नाव कायमचं होणार कमी..! काय आहे कारण? पहा सविस्तर..
ज्या शेतकऱ्यांनी मागेल त्याला कृषी पंप योजना अंतर्गत पेमेंट केले आहे त्या शेतकऱ्यांना घाबरून जाण्याची गरज नाही. कारण ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप देण्यात येणार आहेत. जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांची पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र टप्पा एक मधून आता टप्पा दोन मध्ये व तीन मध्ये जाण्यासाठी जो कालावधी असतो तो कालावधी सध्या सुरू आहे. टप्पा बदलण्यासाठी थोडा वेळ लागण्याची शक्यता आहे. साधारण मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर यामध्ये कंपन्या समाविष्ट केल्या जातील. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या पद्धतीने सध्या योजनेची अंमलबजावणी होते त्यानुसार लवकरच कंपन्या या योजनेसाठी उपलब्ध होतील. त्यानुसार शेतकऱ्यांना पुढील लाभ देखील दिला जाणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा