Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्रातील सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेचा आठवा हप्ता लवकरच लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यानंतर महिला फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान आता हे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे.
लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पुढील आठ दिवसाच्या आत जमा होणार आहेत. असे मुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान अजूनही पैसे महिलांच्या खात्यात जमा झाले नाहीत मात्र पुढील आठ दिवसात हे पैसे महिलांच्या खात्यात नक्कीच जमा होतील असे अजित पवार यांनी सांगितले आहे. यासाठी 3500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
हे पण वाचा: शेतकरी ओळखपत्र कसे काढावे, कोणती कागदपत्र आवश्यक? जाणून घ्या सविस्तर माहिती
फेब्रुवारी महिना हा 28 दिवसाचा आहे त्यामुळे पुढच्या आठ दिवसात महिलांच्या खात्यावर एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. मागील तीन महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा केले जात आहेत. या महिन्याच्या देखील शेवटच्या आठवड्यात या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहेत. Ladki Bahin Yojana Scheme
मार्च महिन्यातील तीन तारखेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्याआधी महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी वेगात सुरू आहे. अर्जाची पडताळणी झाल्यानंतर महिलांना पैसे दिले जाणार आहेत. यासाठी अजून काही दिवस लागू शकतात. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे राज्यातील सर्व महिलांचे लक्ष लागले आहे.
2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार?
विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचार सभेत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असे आश्वासन माहितीच्या सरकारने दिले होते. विधानसभा निवडणूक होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत मात्र तरीदेखील लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळाले नाहीत. 2100 रुपयाचा हप्ता मार्च महिन्यात लाडक्या बहिणींना मिळण्याचे शक्यता आहे. कारण तीन मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे या अर्थसंकल्पात या योजनेच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत मोठी घोषणा करू शकतात. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढील हप्ता 2100 रुपयांचा महिलांना मिळण्याचे शक्यता आहे.