या भागातील 22 हजार लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र; छाननी वेगात सुरू..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Scheme: महाराष्ट्र राज्यात सुप्रसिद्ध ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी या आधी इतर कोणत्याही शासनाच्या योजनेचा लाभ घेतला आहे का नाही याचे पडताळणी वेगात सुरू आहे. या योजनेच्या पडताळणीसाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. दरम्यान छाननी प्रक्रियेत मुंबईमधील 22 हजार महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे. या महिलांना आता तिथून पुढे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही. अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

ज्या लाडक्या बहिणी शासकीय इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे अशा महिला या योजनेसाठी अपात्र होत आहेत. त्याचबरोबर बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकार देखील अनेक ठिकाणी उघडीस आले आहेत. इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड बँक पासबुक आणि इतर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागात अंतर्गत सुरू केली गेली आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत सर्व पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल आणि महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल. त्याचबरोबर नवीन अर्जाची पडताळणी अगदी काटेकोरपणे केली जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेतून कोण होणारा अपात्र

  • ज्या महिलांच्या कुटुंबाचे अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आहे.
  • महिलाच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चार चाकी वाहन असणाऱ्या.
  • महिलांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीला असल्यास.
  • लग्नानंतर दुसऱ्या राज्यात गेलेल्या महिला.
  • शासनाच्या इतर आर्थिक लाभ देणाऱ्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला.
  • बँक खात्यावर आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला.

लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडण्यासाठी कुठे अर्ज करावा?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ सोडण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांमध्ये अर्ज करावा लागेल. दोन शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना नेमक्या कोणत्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे यासाठी स्वयंघोषणापत्र सादर करावे लागणार आहे. मुंबईमध्ये अधिकृत आकडेवारीनुसार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला 2724 आहेत तर श्रावण बाळ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला 1127 आहेत. Ladki Bahin Yojana Scheme

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment