Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्यापर्यंत पैसे जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जुलै महिन्यापासून लाडकी बहिण योजना सुरू करण्यात आली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत जमा केली जाते.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत आत्तापर्यंत एकूण सात हप्त्याचे दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. यानंतर महिलांना फेब्रुवारी महिन्याचे म्हणजेच आठव्या हप्त्याचे पैसे कधी मिळतील याची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 तारखेनंतर महिलांना मिळण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या पंधरा तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होत असते, त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 15 तारखेनंतर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. Ladki Bahin Yojana
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार?
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ अशा आश्वासन दिले होते. मात्र याबाबत अजून अंमलबजावणी करण्यात आलेले नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की येणारे अर्थसंकल्पात याबाबत आम्ही निर्णय घेऊ. त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे की मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात आपण याबाबत चर्चा करू. त्यामुळे नवीन अर्थसंकल्पात याबद्दलची घोषणा होईल आणि त्यानंतर नव्या आर्थिक वर्षापासून महिलांच्या खात्यात एक विषय रुपये जमा होऊ शकतात.
दरम्यान महिला व बालविकास विभागाने लाडकी बहीण योजने संदर्भात काही स्पष्टीकरण दिले आहे. या योजनेअंतर्गत काही महिलांनी चुकीचे माहिती भरून या योजनेचा लाभ घेतला आहे. यावर महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे की याबाबत आमचे विभाग काम करत आहे सर्व महिलांचे अर्जाचे पडताळणी केली जात आहे. मात्र आमच्या विभागाच्या वतीने कोणत्याही लाडक्या बहिणीकडून दिलेले पैसे परत घेतले गेले नाहीत. महिलांच्या खात्यात जमा केलेले पैसे पुनर्वसुलीच्या कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे अशा अफवांवर कोणत्याही लाडक्या बहिणींनी विश्वास ठेवू नका असे आवाहन गाईला व बाल विकास विभागाने केले आहे.
Ladki bahin yojna list of December 2024
9922263550