Kunbi Caste Certificate : असं काढा कुणबी जात प्रमाणपत्र


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kunbi Caste Certificate : राज्यातील 1947 ते 1967 या काळामधील निजामकालीन कुणबीच्या नोंदी पडताळून संबंधित कुटुंबाला मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू झाली आहे. परंतु वडिलांकडून जात येत नसल्याने ज्या कुटुंबात अशी नोंद आढळेल त्या कुटुंबातील सदस्यांनाच फक्त प्रमाणपत्र मिळणार आहे. मुलींच्या सासरच्यांना किंवा मुलाच्या पत्नींना व माहेरच्यांना ते प्रमाणपत्र मिळणार नाही असे विश्वासनीय सूत्रांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

कुणबीचे नोंद असलेल्यांना जात प्रमाणपत्र देताना 1947 पासूनचे बारा विभागाकडील पुरावे पडताळले जात आहेत. दरम्यान १९४७ पासून आतापर्यंत संबंधित कुटुंबामधील सदस्यांची संख्या लाखोच्या घरात पोहोचली असणार आणि तेवढ्यांना प्रमाणपत्र मिळाल्यास ओबीसी वर अन्याय होईल असा एक मतप्रवाह तयार झाला आहे.

पण ज्या, कुटुंबाकडे कुणबीच नोंद आढळली त्या कुटुंबातील मुला मुलींनाच प्रचलित नियमानुसार (वंशावळीनुसार) जात प्रमाणपत्र मिळेल. परंतु त्या कुटुंबातील मुलांच्या पत्नींना त्यांच्या माहेरील लोकांना किंवा कुणबी नोंद असलेल्यांना कुटुंबातील मुलीचा विवाह झाल्यानंतर तिच्या सासरच्यांना त्यांना ते प्रमाणपत्र मिळत नाही असाही नियम आहे.

जाती-वडिलाकडून येत असते आणि त्यांच्या रक्तात संबंधातील तथा कुटुंबातील व्यक्तींना जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रचलित पद्धत आहे. ग्रामपंचायत निवडणूक सुद्धा महिला सदस्यांच्या पतीकडील नव्हे आपण त्यांच्या वडिलाकडची पुरावे ग्राहक धरतो.

Leave a Comment

error: Content is protected !!