Ketu Gochar 2025 : मे महिन्यात लक्ष्मीची होणार कृपा! मिळणार भरघोस धनलाभ सुवर्णकाळ सुरू! यामध्ये तुमची तर रास नाही ना?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ketu Gochar 2025 : केतू ग्रहाच्या चालीत मे महिन्यात मोठा बदल घडणार आहे. विशेष म्हणजे, या महिन्यात केतू दोन वेळा चाल बदलणार आहे आणि या बदलाचा परिणाम थेट तीन राशींवर विशेष रूपाने होणार आहे. अनेकांच्या आयुष्यात हा बदल सुवर्णकाळ घेऊन येणार आहे. अचानक धनलाभ, मान-सन्मान, प्रतिष्ठा, संपत्ती, वाहन अशा अनेक गोष्टी या काळात मिळणार असल्याचं जाणकार सांगतात. चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या तीन नशिबवान राशी…

वृषभ राशी – स्थैर्य, संपत्ती आणि गोड नात्यांचा काळ

वृषभ राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचं संक्रमण अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. यावेळी केतू नक्षत्रही बदलणार असून त्याचा थेट फायदा वृषभ राशीला मिळणार आहे. या काळात नवीन वाहन किंवा मालमत्तेची खरेदी होण्याची शक्यता आहे. बँक-बैलन्समध्ये वाढ होईल. काही लोकांना पूर्वी गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी थकलेली रक्कम मिळेल, कोर्ट कचेऱ्यांमध्ये अडकलेले व्यवहार सोडवले जातील. यासोबतच वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल. पती-पत्नीमध्ये परस्पर विश्वास वाढेल. घरगुती वाद मिटतील आणि घरात स्नेहसंपन्न वातावरण तयार होईल. Ketu Gochar 2025

हे पण वाचा |Daily Astrology Today : या 6 राशीवर लक्ष्मीनारायण ची कृपा! सुख समृद्धी पैसा लाभणार, पहा तुमची राशी आहे का यामध्ये

सिंह राशी – लव्ह लाईफ आणि नेटवर्किंगमध्ये यश

सिंह राशीसाठी केतूच्या चालीत होणारा हा बदल फार शुभ ठरणार आहे. विशेषतः ज्यांचे लग्न ठरले नाही किंवा प्रेमसंबंध टिकवण्यात अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. लव्ह लाईफमध्ये स्थिरता येईल. नवीन ओळखी वाढतील आणि त्या ओळखी भविष्यात उपयोगी ठरतील. मित्रपरिवार, कुटुंब, व्यावसायिक नेटवर्किंग यातून फायदेशीर संधी मिळतील. केतूच्या या संक्रमणामुळे तुमचं आत्मविश्वास वाढेल आणि त्यामुळे अनेक बंद दरवाजे उघडतील. लग्न, प्रेम आणि पार्टनरशी असलेले वाद मिटून, नवे पर्व सुरु होईल.

धनु राशी – नशीब उजळणार, शनीच्या प्रभावातून मुक्ती

धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ थेट नशिबाला उजाळा देणारा आहे. केतूच्या संक्रमणामुळे शनीच्या ढैय्याचे परिणाम कमी होतील आणि मानसिक त्रास दूर होईल. व्यवसायात अचानक संधी मिळेल, तर नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामात अडकलेली फाईल पुढे सरकेल. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप उपयोगी आहे. परीक्षेचे निकाल चांगले येतील. घरात आनंदी वातावरण राहील, कौटुंबिक सलोखा टिकेल. एखादा मोठा निर्णय तुम्हाला यश देईल.

टीप : वरील माहिती ही धार्मिक शास्त्र, ग्रह-गोचर, आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अंदाजांवर आधारित असून याचा उद्देश माहिती देणे हाच आहे. कृपया निर्णय घेण्यापूर्वी ज्योतिष तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

Leave a Comment