Kanda Market : पांढरा सोन्यासह शेतकऱ्यांच्या कांद्याला देखील भाव येत आहे. यावर्षी पावसाळ्यामध्ये सरासरी पेक्षा 12 टक्के कमी पाऊस पडले असल्यास हवामान खात्याने स्पष्ट केलेले आहे.
यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे दुष्काळामुळे खरीप हंगामातील उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. याशिवाय राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ देखील जाहीर करण्यात आलेला आहे. तसेच लाल कांदा लागवड आणि रांगडा कांदा लागवड उशिराने झालेली आहे.
गेल्या दोन-चार दिवसापासून राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे. कालच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. काही तर गारपीट देखील झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड चांदवड तालुक्यात गारपीट झाली याशिवाय येवला देवळा सटाणा मालेगाव मध्ये विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे.
त्याचाच परिणामून नाशिक जिल्ह्यात राज्यातील विविध भागांमध्ये पिकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष आणि कांदा पिकांच्या सर्वाधिक नुकसान झाले असे मत शेतकऱ्यांना मत केलेले आहे. रांगडा आणि लाल कांद्याची या पावसामुळे नुकसान झाले असून, परिणाम म्हणून आता लाल कांद्याचे आणि रांगडा कांद्याचे उत्पादन घडणार असा दावा केला जात आहे.
वाढ झालेली आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून आलेली लालसगाव एमपीएमपीएमसी मध्ये अवकाळी पावसाने आणि गारपीटी मुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचा अर्थ सोमवारी झालेल्या कांदा बाजार भाव 1000 ते दीड हजार रुपये वाढ झालेली आहे.
बाजार अभ्यासाकांनी सांगितल्याप्रमाणे कालचे पावसाचा आणि गारपिटीचा रांगडा आणि लाल कांदा पिकाला मोठा फटका बसणार आहे. यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट येण्याची भीती एवढेच नाही. तर कांदा बारीक साठवलेला उन्हाळी कांदा देखील या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे खराब होऊ शकतो. अशी भीती व्यक्त केली जात आहे.
या सर्वांच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यामध्ये 3000 ते 3400 रुपये प्रति क्विंटल दरम्यान असणाऱ्या कांदा बाजार भाव आज एक हजार रुपयांनी वाढले आहेत. आज लालसगाव एमपीएससी मध्ये उन्हाळी कांद्याला कमाल 5231 आणि सरसरी चार हजार पाचशे रुपये भाव मिळाला आहे. तर लाल कांद्याला कमाल 471 रुपये आणि सरासरी चार हजार दोनशे एवढा भाव मिळालेला आहे.
मात्र या वाढीचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार नाही. अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान केलेल्या असल्याने या भाव वाढीचा फायदा शेतकऱ्यांना नसून भाव वाढ झाली तरीदेखील शेतकरी सध्या नाराज असलेले चित्र निर्माण झालेले आहे.