Jalgaon Gold Rate: सोनं म्हटलं की सर्वसामान्य माणसाच्या मनातही चकाकी येते. सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणं हे केवळ परंपरा नसून अनेक घरांमध्ये भविष्याची बचत मानली जाते. मात्र याच सोन्याचे दर गेले काही दिवस चढ-उताराच्या खेळात अडकले आहेत. यावेळी विशेष म्हणजे, मुंबईच्या तुलनेत जळगावात सोनं अधिक स्वस्त दरात उपलब्ध असल्याने अनेक गुंतवणूकदारांचा कल जळगावकडे वाढू लागलाय. Jalgaon Gold Rate
जळगावमध्ये सोनं आणि चांदी दर!
आज जळगावच्या सराफ बाजारात जीएसटी वगळता 24 कॅरेट सोन्याचा दर 94,700 रुपये प्रति तोळा इतका नोंदवला गेला आहे. विशेष बाब म्हणजे, जीएसटी वगळता चांदीचे दर देखील इतकेच – म्हणजे 94,700 रुपये प्रति किलो आहेत. हे दृश्य फार कमी वेळा पाहायला मिळतं, की सोनं आणि चांदी दोन्हींचे दर एकाच पातळीवर आलेले असतात. जीएसटीसह हे दर 97,500 रुपये झाले आहेत. मागील दोन दिवसांत सोन्यात तब्बल 4,000 रुपयांची, तर चांदीत 6,000 रुपयांची घसरण झाली आहे.
मुंबईत अजून महाग – काय आहेत दर?
दुसरीकडे, मुंबईच्या सराफ बाजारात आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे दर 96,700 रुपये प्रति तोळा इतके आहेत. 23 कॅरेटसाठी दर 92,699 रुपये, 22 कॅरेटसाठी 88,667 रुपये, 20 कॅरेटसाठी 80,607 रुपये, तर 18 कॅरेटसाठी 72,503 रुपये प्रति तोळा आहेत. GST सह 24 कॅरेट सोन्याचे दर 96,775 रुपये नोंदवले गेले असून, यामध्ये 2,700 रुपयांची घसरण झाली आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम भारतातील भावांवर
सोन्याच्या किमती घसरण्यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल मोठ्या प्रमाणात जबाबदार आहेत. MCX वर सोन्याचा वायदा दर तब्बल 3,565 रुपयांनी घसरून 92,985 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. या घसरणीमागे अमेरिकेने चीनसोबत टॅरिफबाबत केलेल्या सकारात्मक चर्चेचा मोठा हात आहे. स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वाटाघाटींमुळे डॉलर निर्देशांकात वाढ झाली आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला.
काय म्हणाले बाजार तज्ज्ञ?
रिलायन्स सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक जिगर त्रिवेदी सांगतात, “डॉलर मजबूत होत असल्यामुळे सोन्याच्या किमती अजून घसरण्याची शक्यता आहे. अल्पावधीत सोन्याचे दर 3,200 डॉलर्सपर्यंत किंवा भारतात 90,000 रुपयांच्या खाली येऊ शकतात.” अशा वेळी गुंतवणूकदारांनी हे सोनं खरेदीसाठी चांगली संधी मानावी, असं ते सुचवतात.
सूचना: सोन्याच्या किमती सतत बदलत असतात. खरेदी करण्यापूर्वी स्थानिक बाजारात दरांची खात्री करून घ्या.
हे पण वाचा| स्वस्तात सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याचे नवीन दर ऐकून ग्राहकांची दुकानात गर्दी..