Cotton Market Price | तुम्हाला तर माहीतच आहे. महाराष्ट्र मध्ये कापूस पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. तसंच या पिकाची राज्यातील मराठवाडा व विदर्भ तसेच खानदेश मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली जाते. यावर्षी शेतकऱ्यांना फारशी निसर्गाने साथ दिली नाही. कसेबसे शेतकऱ्यांनी हे पीक जोपले आहे. तसेच या विभागातील शेतकऱ्यांचे कापूस पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.
परंतु यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापसाच्या उत्पादनामध्ये घट झाली आहे. ही घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना आशा होती की कापूस बाजार भाव मध्ये वाढ होईल, परंतु असे काही झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. कापसाला बाजार बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसून येत आहे.
शेती हवामान आणि बाजार भाव विशेष बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या वर्षीचा बाजारभाव पाहिजे झाले तर गेल्यावर्षी हंगामामध्ये शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला होता. झालेल्या यंदा फारसा पाऊस न झाल्यामुळे कापूस उत्पादनामध्ये झालेली घट पाहता. शेतकऱ्यांना अशा होती की यंदा शेतकऱ्यांना 13000 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळेल. तसेच 2021 22 या हंगामामध्ये कापसाला साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल ते 13 हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाला होता.
केंद्र शासनाच्या माध्यमातून कापसाला सहा हजार सहाशे वीस रुपये ते सात हजार वीस रुपये एवढा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. म्हणजे लॉंग स्टेपला कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल आणि मध्यम स्टेपला कापसाला सहा हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल एवढा सरकारद्वारे हमीभाव देण्यात आलेला आहे.
सद्यस्थितीला मात्र राज्यातील अनेक बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी दरामध्ये कापूस खरेदी केला जात आहे. काही ठिकाणी हमीभावाच्या आसपास बाजार भाव नमूद केला जात आहे. एक तर मान्सून काळात यावर्षी चांगला पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्याच्या उत्पादनामध्ये मोठी घट झाली असून, त्यामध्ये शेत पिकाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला दिसून येत आहे.
तर या उत्पादन केलेल्या मालगाव देखील चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. यामुळे शेतकरी आणखी कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. परंतु मात्र अशातच एक दिलासादायक चित्र समोर येत आहे.
महाराष्ट्रातील सर्वात बाजार समिती दबवामध्ये आहेत. मात्र राज्यातील एका बाजारात कापसाला समाधानकारक भाव मिळाला आहे काल देखील बाजारात कापसाला चांगला दर मिळाला होता.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकष्ट प्राप्त झालेल्या माहितीनुसार अकोला बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावामध्ये, कापसाला कमाल सात हजार चारशे प्रतिक्विंटल एवढा भाव मिळालेला आहे.
निश्चित हा शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असा भाव नाही, परंतु इतर बाजार समितीच्या दराशी तुलना केली असता हे दर किंचित समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे. या एपीएमसी मध्ये काल कापसाला किमान 699 कमाल सात हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल आणि सरासरी 7199 रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.