IMD Weather Alert | महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल झालेला असून पावसाने पुन्हा एकदा जोर धरलेला आहे. राज्यामध्ये अनेक भागात नद्या ओसांडून वाहू लागलेले आहेत. आणि अनेक ठिकाणी रस्ते बंद पडलेले आहेत आणि शाळा बंद करण्याची वेळ देखील आलेले आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, कोकण, मध्य महराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास अत्यंत धोकादायक ठरणार आहेत. अकरा जिल्ह्यांमध्ये हायलर्ट देण्यात आलेला आहे आणि NDRF टीम सतर्क करण्यात आलेल्या आहेत. IMD Weather Alert
विदर्भात वादळांच सावट, नागपूर सह अनेक जिल्हे धोक्यांच्या रेषेवर
नागपूर जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळी झालेला आहे. जिल्हाधिकारी विपीन इटकर यांनी पष्ट केलं की, जर परिस्थिती बिघडली, तर लष्कराची मदत घेतली जाईल. नागपुरात आजही Orange Alert जारी करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 40 नागरिकांना रिस्क्यू केला गेला आहे. शाळा बंद, आणि लोकांना घरातच थांबवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक वाढत आहे यामुळे या ठिकाणी सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा मारा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
कोकण मध्ये मुसळधार पावसाचा तडाका हे जिल्हे Red alert वर
कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळलेला आहे. हवामान विभागाने रिडलर जारी केलेला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा आहे. मुंबईत देखील काही भागात पाऊस तुफान पडत आहे. हवामान विभागाने आव्हान केले आहे की,”कृपया समुद्रकिनारी जाऊ नका, सुरक्षित रहा.”
मध्य महाराष्ट्राला जोडपणार
आज देखील मध्य महाराष्ट्र मध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. घाटमाथ्यावरती दुकान आणि मुसळधार पावसाचा थैमान सध्या सुरू आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पंचगणी परिसरात दरड कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे. पुणे, सांगली आणि कोल्हापूरमध्ये देखील अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला असेल प्रशासन सतर्क मोडवर आला आहे.
मराठवाड्यात पावसाचा कहर
बाकी विभागाप्रमाणे मराठवाड्यात देखील आज वादळी वारे आणि अति मुसलदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने या पार्श्वभूमी वरती छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच कृषी क्षेत्रावर ताण पडण्याची शक्यता आहे.
राज्यामध्ये सध्या पावसाचा थैमान सुरू असताना शासनाने देखील उपाययोजना सुरू केलेले आहेत, ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे व पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणी NDRF आणि SDRF च्या टीम तयार असून, लष्कर रेडी मोड मध्ये आहे. मात्र प्रशासन वारंवार सांगत आहे. सतर्क रहा आवश्यक असेल तरच बाहेर पडा. पावसाने राज्यात भीषण रोग घेतला आहे नदी नाल्यांची पातळी वाढत चाललेली आहे, शहरांमध्ये पाणी साचतय, आणि कोणत्या वेळी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच अशाच नवनवीन हवामान अंदाज साठी Digitalpor.in या पोर्टलला फॉलो करत चला.