IMD Cyclone Alert: मागील काही दिवसापासून देशावर मोठे चक्रीवादळ घोंगावत असून, आयएमडी कडून पुन्हा एकदा देशात अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. देशातील काही भागांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अतिशय मोठी बातमी समोर येत आहे, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच देशभरात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले होते. देशातील अनेक राज्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमानाची नोंद करण्यात आली होती.
आयएमडी कडून देशातील अनेक भागांमध्ये चक्रीवादळामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासांमध्ये लडाख आणि जम्मू काश्मीर मध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच जोरदार बर्फ वृष्टी ची होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जम्मू-काश्मीर सोबतच पुढील दोन दिवसांमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये देखील काही भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये कडाक्याची थंडी देखील पडणार आहे.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार बांगलादेश आणि आसामवर चक्रीवादळाचे संकट आले आहे. यामुळे पुढील 48 तासांमध्ये आसाम मेघालय आणि अरुणाचल प्रदेश मध्ये मेघगर्जनासोबत वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासोबतच उत्तर भारतात देखील अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्ये सहा ते सात फेब्रुवारी रोजी अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. IMD Cyclone Alert
बिहारमध्ये देखील जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागणी वर्तवली आहे. बिहारच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा चक्र वादळाची स्थिती निर्माण झाल्याने हवामान विभागाकडून या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. महाराष्ट्र बाबत बोलायचे झाल्यास महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवसात तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये गारठा कायम राहणार असून, महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता खूपच कमी आहे.