Horoscope : आजपासून नशिबाचं दरवाजं उघडणार! ‘या’ राशीच्या लोकांवर राहू-केतूचा जोरदार प्रभाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Horoscope : १८ मे २०२५ रोजी संध्याकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी ग्रहमानात एक मोठा बदल घडणार आहे. राहू ग्रह वक्री चाल करत कुंभ राशीत प्रवेश करणार आहे तर केतू सिंह राशीत स्थिरावणार आहे. हे दोन्ही ग्रह मायावी आणि गूढ मानले जातात, पण त्यांचं प्रभावशाली अस्तित्व आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतं. या राशींच्या स्थितीमुळे अनेकांचं नशिबच वळणार आहे. विशेषतः तीन राशींच्या लोकांसाठी हे काळे छायाग्रही ग्रह आता तेज देणारे ठरणार आहेत. या राशींवर धनवर्षा होणार असून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर यशाचं तेज लाभणार आहे. ज्यांचं नशिब सध्या झोपलेलं आहे, त्यांच्या जीवनात एक नवा सूर्योदय होणार आहे.Horoscope

शेती करणारा असो की दुकान चालवणारा, नोकरी करणारा असो की शिक्षण घेणारा या ग्रहांच्या सकारात्मक स्थितीचा फायदा सर्वांनाच मिळणार आहे. आपल्याला जे हवं होतं ते आता हळूहळू जवळ येणार आहे. काही वेळा वाटायचं की किती झगडलं, प्रयत्न केलं तरी यश दूरच राहील. पण आता तेच यश आपल्याला वाकवून सलाम करणार आहे. कारण या काळात जे काही तुम्ही हात घालाल, त्यात सोनेच निघणार आहे. मनातल्या इच्छा पूर्ण होतील, आणि आर्थिक बळ वाढेल. तुमचं आत्मविश्वास वाढेल, आणि समाजातही तुमचं मान-सन्मान वाढू लागेल.

  1. वृषभ (वृशभ) राशी – पैसा आणि समाधान दोन्ही मिळणार

वृषभ राशीच्या लोकांना राहू-केतूचं राशी बदलणं प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. अचानक धनलाभाची शक्यता आहे. जुनी थकलेली रक्कम मिळू शकते. कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. नोकरीत पदोन्नती मिळेल, आणि व्यवसायातही वाढ होईल. जिथे अडकलेले व्यवहार होते, तिथे आता गती मिळेल. एखादी जुनी मालमत्ता विकून पैसा मिळण्याची शक्यता आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी उधारीनं बी-बियाणं घेतलं होतं, त्यांना उत्पन्नात वाढ होऊन तो भार उतरवता येईल.

  1. मिथुन राशी – भाग्य उजळणार, स्वप्नातलं यश साकार

मिथुन राशीच्या व्यक्तींना या गोचरामुळे खूप शुभ परिणाम मिळणार आहेत. आयुष्यात अनेक आनंदी गोष्टी घडतील. मुलांकडून अभिमान वाटावा अशा बातम्या येतील. नवीन संधी येतील आणि त्यातून तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल. व्यवसायात स्थैर्य येईल. अनेकांच्या मनात असलेली ‘कधी मोठं काही करेन’ ही भावना आता प्रत्यक्षात उतरू शकते. शेतकरी वर्गासाठीही हाच काळ पिकवाढीसाठी अनुकूल राहील. नोकरी करणाऱ्यांना ट्रान्सफर, प्रमोशन किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

  1. कुंभ राशी – धन, सुख, प्रतिष्ठा मिळणार

या काळात राहू तुमच्या राशीतच स्थिरावणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना विशेषतः आर्थिक सुखाची प्राप्ती होईल. घरात काहीतरी नवीन खरेदी होण्याची शक्यता आहे. मनातली अनेक वर्षांची स्वप्नं आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील. तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करत राहाल, तोपर्यंत तुम्हाला यशच यश मिळत राहील. गावपातळीवर तुमची ओळख वाढेल, लोक तुमचा सल्ला घेतील. शेतकरी वर्गासाठी बाजारभाव चांगले मिळतील. तुमचं आयुष्य नव्या दिशेने जाणार आहे.

उर्वरित राशींसाठी काय?

जरी ही शुभ बातमी तीन राशींसाठी अधिक प्रभावी असली, तरी इतर राशींवरही काही ना काही परिणाम दिसून येईल. कोणी मन:शांती अनुभवेल, तर कोणी जुने वाद मिटवेल. काहींना आरोग्य लाभेल, तर काहींना मानसिक बळ मिळेल. मात्र यासाठी प्रत्येकाने संयम, सातत्य आणि श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे.

ग्रह बदलतात, काळ बदलतो पण आपल्या मेहनतीचा, सातत्याचा आणि श्रद्धेचा विजय नेहमीच होतो. राहू-केतूच्या या गोचरात संधींचं दार उघडणार आहे. या दारातून पाऊल टाकायचं की नाही, हे तुमच्याच हातात आहे. शेतकऱ्यांनी पीकनियोजनात बदल करावा, तर नोकरी-व्यवसाय करणाऱ्यांनी नवे निर्णय घेण्यास मागे नको हटू. कारण आता काळ तुमच्याच बाजूने आहे.

हे पण वाचा | आजचे राशीभविष्य- मकर संक्रांती दिवशी या राशींचे भाग्य उजळणार

(Disclaimer : वरील माहिती ही प्रसारमाध्यम व इतर माहिती स्त्रोतांच्या आधारे आहे. या बातमी वरती विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या. व याबाबत आम्ही कुठलाही दवा करत नाही.)

Leave a Comment

error: Content is protected !!