Sugarcane Rate: कोल्हापूर येथील बिद्री तालुका कागल येथील दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाला प्रति टन 3407 रुपये दर जाहीर करण्यात आला. व प्रति टन 3200 रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी 207 रुपये देणार आहेत. हा दर उचल राज्यातील सर्वात जास्त असून कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी राज्यात ऊस दरात आपणच भारी असल्याचे दाखवून दिले आहे.
बिद्री साखर कारखान्याचे आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक दराची परंपरा प्रत्येक वर्षी आहे मागील हंगामात 12.62% साखर उताऱ्याला प्रति टन 3209 रुपये दर दिला होता. मागील हंगामात 8 लाख 80 हजार टनाचे गाळप केले होते. यावर्षी स्वाभिमानाने ऊस दराचे आंदोलन सुरू केले, व कारखान्याची निवडणूक असल्याने त्यांना दर जाहीर करता आला नाही.
प्रचार सभांमधून ते सभासदांना आश्वासित करत होते. कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी येथील पंचगंगा साखर कारखान्याने प्रति टन 3300 रुपये जाहीर केला आहे. त्यापेक्षा जादा दर जाहीर करून ‘बिद्री’ ने राज्यात आपणच ऊस दरात भारी, असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
निवडणुकीतील शब्द हा खरा ठरवला.
‘बिद्री’ ची निवडणूक पंधरा दिवसांपूर्वी झाली, या प्रचारादरम्यान सभासदांना अपेक्षा जास्तं दर देण्याचा शब्द साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी पाटील यांनी दिलां होता. तो खरा ठरल्याची चर्चा ही ‘बिद्री’ परिसरात आहे.