Harbara Bajar Bhav | राज्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या बाजारामध्ये नवीन हरभरा येण्यास सुरुवात झालेली असून शेतकऱ्यांचा हरभरा विक्री कल वाढत आहे. सध्या शेतकऱ्यांना पैशाची निकड भासत असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीप्रमाणे हरभाई विक्रीला काढला आहे.
अमरावती बाजार समितीमध्ये हरभऱ्याची सर्वाधिक आवक झालेली आहे तब्बल नऊ हजार 249 क्विंटल हरभरा आवक झालेली आहे इथे (Harbara Bajar Bhav) हरभराला सर्वसाधारण 5425 रुपये इतका भाव मिळाला आहे.
मागील काही दिवसांपासून काट्या हायब्रीड, लाल, न1 चाफा काबुली हरभऱ्याची राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे. नो मायक्रोची राज्यामध्ये दहा हजार 622 क्विंटल एवढा हरभरा बाजारपेठेमध्ये आला होता हरभऱ्याला सर्वसाधारण पाच हजार तीनशे ते सहा हजार दोनशे रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला होता.
सध्या अकोला बाजार समितीमध्ये या आठवड्यामध्ये विक्रमी हरभऱ्याची आवक झालेली आहे बाजार समितीचे आवरमध्ये हरभरा शेतमालाच्या वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या परिणामी हरभरा उतरवण्यात शेतकऱ्यांची चांगलीच फजिती झाली.
राज्यात कुठे काय मिळतोय भाव? Harbara Bajar Bhav
अमरावती बाजार समितीमध्ये नऊ हजार 249 क्विंटल हरभरा आवक झाली. कमीत कमी 5000 ते सर्वसाधारण 5425 रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथे तीन क्विंटल हरभरा आवक झाली. तसेच कमीत कमी पाच हजार दोनशे ते जास्तीत जास्त पाच हजार दोनशे इतका दर मिळाला आहे.
तसेच धाराशिव मध्ये 45 क्विंटल इतका हरभरा आवक झाली. इथे प्रतिक्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे ते जास्तीत जास्त 5 हजार 550 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. जळगाव जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये काबुली हरभरा 42 क्विंटल आवक झाली तसेच इथे कमीत कमी 7561 ते जास्तीत जास्त 7,695 इतका दर मिळाला आहे.
तसेच सोलापूर बाजार समितीमध्ये 57 क्विंटल हरभरा आवक झाली. येथे कमीत कमी पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे क्विंटल इतका दर मिळाला आहे. तसेच यवतमाळ येथे लाल हरभरा 480 क्विंटल आवक झाले असून येथे कमीत कमी 5300 ते जास्तीत जास्त पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल इतका दर मिळाला आहे.
तसेच पुणे येथे 38 क्विंटल हरभरा आवक झाली तसेच इथे 5500 ते 5850 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे.