Government New Rules | नेटवर्क सेवा सुरु झाल्यापासून डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आहे. आता प्रत्येक जण कॅशवर न करता डिजिटल व्यवहार करू लागला आहे. फोन पे, गुगल पे, पेटीएम यासारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून नागरिक आता डिजिटल व्यवहार करत आहेत. मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन व्यवहार करत असाल तरी ही बातमी तुमच्या कामाची असणार आहे.
नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना काही नियम व अटी घालण्यात आल्या होत्या. व्यवहार करत असताना फक्त एक लाख रुपये पर्यंतची मुदत होती. आता तुम्ही एक किंवा दोन लाख नाहीतर पाच लाख रुपये पर्यंतची रक्कम सहज पाठवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला IMPS सर्विस चा वापर करावा लागणार आहे. परंतु यासाठी नेमकं करावं काय लागणार आहे. हे आपण सविस्तर पर्यंत जाणून घेणार आहोत.
मित्रांनो जर तुम्हाला पाच लाख रुपये पर्यंत ऑनलाईन रक्कम पाठवायची असेल तर तुम्हाला त्यासाठी तुमचा फोन बँकिंग किंवा नेट बँकिंग जोडावे लागणार आहे. आणि तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत. त्याचे संपूर्ण नाव आणि मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. म्हणजे काम देखील सोपे होणार आहे.
IMPS ने मोठी रक्कम पाठवण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याचे नाव बँक खाते क्रमांक आणि आयएफसी कोड टाकावे लागणार आहे. या प्रक्रिया थोडा वेळ लागतो. परंतु आता नवीन नियम लागू झाल्यामुळे तुम्हाला एवढी मोठी रकमेची प्रक्रिया करावी लागणार नाही. यासाठी तुम्हाला बँक खाते नोंदणीकृत मोबाईल नंबर क्रमांक व नावाद्वारे पाच लाख रुपये पर्यंतचे ऑनलाइन व्यवहार करण्यात मदत होणार आहे.
1 फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमात झाले मोठे बदल
यादी देखील आम्ही तुम्हाला याविषयी माहिती दिली होती. NPCI ने 31 ऑक्टोबर रोजी परिपत्रक जारी केलेले होते एक फेब्रुवारीपासून ऑनलाइन व्यवहारामध्ये मोठे बदल होणार आहेत. म्हणजे IMPS चे नियम बदलले जाणार आहेत. या आधारावर आता कोणतेही व्यक्ती, त्यांचे नाव काही असो कोणत्याही लाभार्थ्याला पाच लाख रुपये पर्यंत करू शकतो. सध्याला लाभार्थी तपशील जोडली जात नाही तोपर्यंत निधी हस्तांतरित केला जाऊ शकत नाही.