Google Pay and Paytm : यूपीआयने पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. खरे तर आपल्या देशात गेल्या काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंटला मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
कॅशने व्यवहार करण्याची आता ऑनलाईन व्यवहार करण्यास नागरिकांकडून पसंती दाखवली जातं आहे. ऑनलाइन पेमेंट साठी आपल्या देशात गुगल पेमेंट एप्लीकेशन चा वापर केला जात आहे.
दरम्यान गुगल पे, पेटीएम पे, ॲमेझॉन पे, फोन पे यांसारखे यूपीआय पेमेंट एप्लीकेशन च्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणाऱ्या नागरिकांसाठी आरबीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यूपीआय लिमिट वाढवण्याचे जाहीर केले आहे. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी प्रसार माध्यमांना याबाबत माहिती दिली आहे.
दासीने सांगितल्याप्रमाणे यूपीआय ट्रांजेक्शनची लिमिट आता एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपये एवढी करण्यात आली आहे.
जर तुम्हीही यूपीआय द्वारे पेमेंट करत असाल, तर म्हणजेच गुगल पे, फोन पे, पेटीएम, ॲमेझॉन पे यांसारख्या डिजिटल पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून पेमेंट करत असाल, तर तुम्हाला ठाऊकच असेल, की सध्या यूटीआय द्वारे पेमेंट करण्यासाठी एक लिमिट सेट करून देण्यात आले आहे.
आता स्थितीला डेली यूपीआय ट्रांजेक्शन लिमिट एक लाख रुपये एवढी आहे. आता मात्र ही लिमिट पाच लाखापर्यंत वाढण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
मात्र, शैक्षणिक संस्था आणि मेडिकल संस्थांना पेमेंट करण्यासाठीच हे लिमिट वाढवण्यात आलं आहे.
अर्थातच जर तुम्हाला कोणाला पैसे द्यायचे असतील, तर तुम्हाला पूर्वीप्रमाणे फक्त एक लाख रुपयांपर्यंतचे यूपीआय ट्रांजेक्शन करता येणार आहे.
पण शैक्षणिक संस्था तसेच मेडिकल संस्था यांना आता पाच लाख रुपयांपर्यंतचे ट्रांजेक्शन करता येणार आहे.