Free Gas Cylinder: ग्रामीण भागामध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. याद्वारे निर्माण होणाऱ्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत गोरगरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले आहे. जर तुम्ही देखील या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडर मिळवण्याचा विचार करत असाल तर यासाठी कुठे अर्ज करावा कसा अर्ज करावा याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
पीएम उज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिला बीपीएल किंवा अंत्योदय अन्न योजना मध्ये असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. उज्वला योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. Free Gas Cylinder
अर्ज कसा करावा?
- सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल, ज्याची लिंक आम्ही वरती दिली आहे.
- त्यानंतर apply for new ujjwala 2.0 connection या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- उपलब्ध गॅस वितरणाच्या यादीतून तुम्हाला आवश्यक गॅस कनेक्शन निवडा.
- त्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरा; जसे की अर्जदाराचे नाव, गॅस वितरणाचे नाव, मोबाईल नंबर संपूर्ण पत्ता आणि पिन कोड.
- त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अपलोड करा; यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते पासबुक इत्यादी.
- त्यानंतर सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा.
आवश्यक पात्रता
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
- अर्जदाराच्या कुटुंबात अगोदर गॅस कनेक्शन नसावे.
- लाभार्थ्यांचे बँक खाते डीबीटी ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्यांकडे बीपीएल किंवा अंत्योदय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
अर्ज केल्यानंतर किती दिवसांनी मिळणार गॅस सिलेंडर
योजनेचा अर्ज मंजूर झाल्यानंतर काही दिवसात लाभार्थ्यांच्या नावावर मोफत गॅस कनेक्शन दिले जाईन. यासाठी स्थानिक गॅस वितरणाच्या कार्यालयाशी तुम्हाला संपर्क साधावा लागेल. प्रधानमंत्री उज्वला योजना महिलांसाठी आहे. जर तुम्ही पात्र असाल आणि अजून या योजनेचा लाभ घेतला नसेल तर वरील माहितीप्रमाणे त्वरित अर्ज करा आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्या.