Farmers’ Incentive Grant: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 50 हजार रुपये प्रस्थान अनुदान कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याविषयी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जे शेतकरी राज्यातील नियमित कर्ज परतफेड करतात म्हणजेच पीक कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून पन्नास हजाराचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.
शेतकरी कर्जमुक्ती योजनेत मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतकरी पात्र करण्यात आले होते. नियमतपणे कर्ज परतफेड करणाऱ्या 2022 मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजाराचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा शासनाचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण 153 लाख शेतकरी असून शेती व शेती निगडित कामाकरिता शेतकरी व्यापारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी बँकेकडून कर्ज घेतात. यापैकी बरेच शेतकरी त्या कर्जाची नियमितपणे परतफेड करतात पण बरेच शेतकरी कर्जाची परतफेड करू शकत नाहीत. 2022 मध्ये राज्यांमध्ये अवेळी पाऊस झाल्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कमी झाले होते.
पावसाच्या अनियमितपणामुळे शेतकऱ्यांनी घेतलेले कर्जाची परतफेड करता आली नाही. अशा परिस्थितीत देखील ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली अशा सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 29 जुलै 2022 रोजी प्रमाणे शासनाच्या निर्णयाप्रमाणे पन्नास हजार रुपये अनुदान वाटपाला मंजुरी देण्यात आली आहे.
याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ | Farmers’ Incentive Grant
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एक आर्थिक वर्षात दोन वेळेस पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. यासाठी नवीन जीआर निर्गमित करण्यात आला आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्यात शासन कार्य नियमावली मधील कलम 294 तरतुदीनुसार मुक्त योजनेच्या शासन निर्णयात बदल करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्रता देण्यात आलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांच्या नवीन याद्या या पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदानामध्ये आलेले आहेत. परंतु त्यांच्या आधार कार्ड चुकीचे असल्यामुळे त्यांना या योजनेचा अद्यापत मिळाला नाही. जर या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचे आधार कार्ड दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.
हे पण वाचा:- तुमचे जुने आधार कार्ड मोफत लवकर अपडेट करा, अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल, पहा संपूर्ण प्रक्रिया
1 thought on “फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान, पहा सविस्तर माहिती”