Farmer News: दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप सरकारला मोठे यश मिळाले आहे. या ठिकाणी भाजपचा मोठा विजय झाला आहे. दरम्यान भाजपच्या या विजयात मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कारण प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजने संबंधित शेतकऱ्यांना आता प्रत्येकी तीन महिन्याला दोन हजार रुपया ऐवजी तीन हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच संपूर्ण वर्षात शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत एकूण नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत.
देशाची राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल पूर्णपणे भाजप सरकारच्या वतीने लागला आहे. तब्बल 27 वर्षानंतर राज्यात भाजपाचे सरकार स्थापन झाले आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर राजधानी दिल्लीतील जनता भाजपने आपल्या निवडणुकीतील भाषणात आणि जाहीरनाम्यात दिलेली सर्व आश्वासने लक्षात ठेवणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करणार का? असा प्रश्न दिल्लीतील जनतेकडून उपस्थित केला जात आहे.
हे पण वाचा | लाडक्या शेतकरी बहिणींची चिंता वाढली! राज्यातील 19 लाख शेतकरी महिला योजनेतून अपात्र?
भाजपने काय दिले होते आश्वासन?
दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपया ऐवजी नऊ हजार रुपये दिले जातील. असे आश्वासन भाजपच्या नेत्यांनी दिले होते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये याप्रमाणे दिल्लीतील शेतकऱ्यांना आता तीन हजार रुपये याप्रमाणे पैसे मिळतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या मोठ्या नेत्यांनी ही घोषणा केली होती. त्या गोष्टींपैकी ही घोषणा दिल्लीतील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना भाजप सरकारकडून एक वर्षात 9 हजार रुपये देऊ.
हे पण वाचा | फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? लाडक्या बहिणींसाठी आली मोठी अपडेट समोर..
किती शेतकऱ्यांना फायदा मिळणार?
देशाची राजधानी दिल्ली तील खेड्यापाड्यात सुमारे 40 हजार शेतकरी आहेत. अहवालानुसार दिल्लीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची एकूण संख्या एक चतुर्थ अंश एवढी आहे. जर आपण आकडेवारीवर नजर टाकली तर दिल्लीत प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजने संबंधित शेतकऱ्यांची संख्या सध्या दहा हजार आठशेच्या आसपास आहे. Farmer News
पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्यक्ष शेतकऱ्याला 9000 रुपये दिले तर दिल्ली सरकारला या योजनेसाठी कोट्यावधी रुपयाची तजबीज करावी लागणार आहे. आकडेवारीनुसार दरवर्षी दहा हजार आठशे हुन अधिक शेतकऱ्यांना 9 हजार रुपये दिले गेल्यावर सुमारे 9 कोटी 75 लाख रुपयाचे बजेट लागणार आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींचे आयकर रेकॉर्ड तपासणार; लाखो महिला होणार अपात्र..
दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना 19 व हप्ता 24 फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्माननिधी योजनेचा 19 वा हप्ता वितरित केला जाणार आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पी एम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत अकरा कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. ज्याची रक्कम तीन लाख 50 हजार कोटी रुपये एवढे होत आहे.