Farmer Loan | शेती करत असताना शेतकऱ्यांना पैशाची गरज भासते. एन लागवडीच्या वेळेस शेतकऱ्यांकडे भांडवल उपलब्ध नसते. त्यावेळी (Farmer Loan) शेतकरी बँकेतून कर्ज घेतात. परंतु अलीकडे शहर रोज शेतकऱ्यांची ओरडा येत आहे की बँका टायमावर कर्ज देत नाही त्यामुळे शेती करत असताना शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो.
अशावेळी शेतकरी सावकारी कर्जाकडे पाठ फिरवतात आणि ते शेतकऱ्यांना परवडणारे नसते. त्यावेळी शेतकरी कर्जबाजारी होऊन जातो व सावकार कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना बेजार करतो.
यामुळे शेतकरी टोकाचे पाऊल चालतात. परंतु आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन त्यांच्यासाठी अधिक तात्काळ कर्ज उपलब्ध व्हावी यासाठी एक अनोखा प्रयोग हाती घेतलेला आहे.
केंद्र शासनाने सुरू केलेल्या या प्रयोगांतर्गत शेतकऱ्यांना आता फक्त दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपये पर्यंत जे कर्ज उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे हे कर्ज शेतकऱ्यांना परवडणारे आहे. यासाठी शेतकऱ्यांना काही घाण ठेवण्याची गरज लागणार नाही तर हे कर्ज मिळण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे. आपण ते सविस्तर पणे जाणून घेणार आहोत.
केंद्र सरकार अतर्गत राबवण्यात येणार हे अनोखे प्रयोग
केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी आता दहा मिनिटांमध्ये कर्ज उपलब्ध होणार आहे. त्यासाठी सरकार अंतर्गत एक अनोखा प्रयोग राबवला जात आहे. हा प्रयोग प्रकल्प तत्त्वावर राबवला जाणार आहे त्यासाठी देशातून महाराष्ट्रामधील बीड आणि उत्तर प्रदेशातील फारुख बाद या दोन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे.
प्रामुख्याने राज्यातील बीड जिल्ह्यामध्ये राज्य सरकारच्या ईपीक पाहणे आणि जमिनीच्या नोंदणीचा आधार घेऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे सातबारा उतारे आधार कार्ड सोबत जोडले जात आहे.
त्यातील सुमारे 65 टक्के काम पूर्ण झालेले आहे असे शासकीय पातळीवरून सांगितले जात आहे त्यामुळे आता लवकर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास मदत होणार आहे.
दहा मिनिटांमध्ये मिळणार शेतकऱ्यांना कर्ज Farmer Loan
ज्या शेतकऱ्यांना दहा मिनिटांमध्ये कर्ज हवे असेल. त्यांना केंद्र सरकारचे नवीन ॲग्री स्टक ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. यामध्ये तुमचे नाव आणि आधार क्रमांक टाकून पडताळणी केली जाईल. त्यानंतर शेतकऱ्याच ओळख पटवल्यानंतर. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना या ॲपच्या माध्यमातून बँकाच्या कर्जाच्या ऑफर्स दिला जातील.
त्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार कर्ज घेऊ शकता व त्यानंतर तुम्हाला दहा मिनिटांमध्ये बँकेकडून शेतकऱ्याच्या खात्यावरती कर्जाची रक्कम जमा केली जाणार आहे.
हे कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आवश्यक असणार आहे. कारण शेतकऱ्यांनी ही काहीही घाण न ठेवणारे म्हणजे मिळणारे कर्ज किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून मिळणार आहे