Drought Relief : राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही भागात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तर राज्य सरकारने चाळीस तालुक्यामध्ये आणि काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ दृश्य परिस्थिती जाहीर करून तेथील भागातील शेतकऱ्यांना दुष्काळ मदत जाहीर केली आहे.
( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )
परंतु राज्य सरकारने अद्याप दुष्काळग्रस्त भागातील बळीराजाला व नागरिकांना मदत दिली नाही. ही मदत कधी मिळणार ते आपण जाणून घेणार आहोत.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त भागामध्ये दुष्काळी जाहीर करून त्यांना सवलती देण्यास मंजुरी दिली आहे. परंतु अजूनही त्यांनाही मदत मिळालेली नाही. त्यांच्यापर्यंत दुष्काळग्रस्तंसाठी सुविधा पोहोचल्या नाहीत याकडे सरकारचे लक्षवेध दुष्काळग्रस्त यांनी आर्थिक मदत कधी देणार असा सवाल विरोधकाकडून होते आहे.
राज्य सरकारने 40 तालुक्यामध्ये आणि सुमारे बाराशे महसूल मंडळात दुष्काळ जाहीर केला आहे. पण कुठेही उपयोजना या भागात अद्याप केल्या नाहीत. आणि दुष्काळग्रस्तांना अद्याप आर्थिक मदत दिली नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेले आहे.
दुष्काळग्रस्त भागातील त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत लवकरात लवकर द्यावी. शासकीय सुविधा उपलब्ध करावे, पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडावा. जनावरांच्या चाऱ्यांसाठी युद्धपातळीवर मोहीम राबवावी.
जे सरकार जनतेचे प्रश्न सोडवते शेतकऱ्यांचे हाकेला धावून येते ते सरकार खऱ्या अर्थाने जनतेचे सरकार असते. पण सध्याच्या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. अशी टीका काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनी केले आहे.
खऱ्या अर्थाने शेतकरी कमी पाऊस झाल्यामुळे अडचणी सापडला आहे. मालाला योग्य न भाव मिळणे व अवकाळी पाऊस यासारख्या संकटामुळे शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला दिसून येत आहे. लवकरात लवकर सरकारने त्यांची मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.