जगातल असे एक गाव, जिथे पावसात पडत नाही; तुम्हाला माहित आहे का हे गाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Did you know : पाऊस आपला जीवनाचा श्वास आहे, आणि पाऊस आपल्या जीवनातील सर्व गोष्टी ठरवत असतो. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अनेक शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद म्हटले की पावसाच्या सरी डोंगर माथ्यावरून झरझर वाहणारे झरे, गावच्या विहिरी, तलाव, ओढे नाले भरून वाहत असतात. शेतकरी रानात राब राब राबवतो आई अंगणात पिठलं करायला पाणी गरम करत असते. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मातीच्या कनात पावसाच्या आठवणी भरलेल्या असतात. पण भाऊ, तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का जगामध्ये असे गाव आहे जिथे कधीच पाऊस पडत नाही.. होय, कधीच पाऊस पडत नाही. तरीसुद्धा लोक तिथले जिवंत आहे, हसताय, निसर्गात रमलेले आणि जगाला जगण्याचा एक वेगळाच धडा शिकवताय. कोणता हे गाव जाणून घेऊया Did you know

आम्ही तुमच्यासाठी ही एक इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आलेलो आहोत. जिथे कधीच पाऊस पडत नाही, ते गाव म्हणजे हुतैब, यमन देशात वसलेलं. डोंगरदर्‍याच्या कुशीत समुद्रसपाटीपासून तब्बल 3200 मीटर उंचीवर हे गाव बसल आहे. हे गाव इतक्या उंचीवर आहे की, पावसाचे ढग सुद्धा त्यांच्या खालून जातात! डग खाली जातात आणि पाऊस खाली कोसळतो गावात मात्र पावसाचा थेंब पण पडत नाही. तरीही इथले लोक हताश नाहीत, उलटते डोंगराच्या त्या उंच माथ्यावर आपलं जीवन निसर्गाशी लढत, पण त्यांचं सुंदर रूप जपत जगताय.

गावात पाणी नाही म्हणून ते पाण्या वाचून राहत नाही असं नाही. हे लोक त्या खालच्या ढगात सोडलेल्या पाण्याला वाहिन्यांमधून गोळा करतात आणि गावात नेतात. म्हणजे ढगांच पाणी, पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची जिद्द त्यांच्या हृदयात भरलेली आहे. ते हे ऐकूनच अंगावर शहारा यावा असं.

अल हुतैब हे गाव केवळ निसर्गाची किमया नाही, तर वस्तू कलेचा एक अद्भुत नमुना आहे. प्राचीन काळात बांधलेल्या इमारती, त्यावरचा सुंदर नक्षीकाम, त्यात मिळालेली आधुनिक रचना हे सगळं पाहताना असं वाटतं की, काळ थांबला आहे. पर्यटक दरवर्षी हजारांच्या संख्येने या गावात येतात. कुणी निसर्ग पाहायला, कुणी वास्तू शिल्प पाहिला, तर कोणी जीवन जगण्याची नवी उमेद घ्यायला!

सकाळी गाव थंडगार असत, हिवाळ्यात तर चहा प्यायला हातात कब धरावासा वाटतो. पण जसं जसं सूर्य वर येतो, तसं तसं वातावरण गरम होतं. आणि तरीही, त्या गरम हवेत सुद्धा, गावकऱ्यांचं हसणं थांबत नाही. कारण त्यांना माहित आहे की पाऊस नसला तरी आपुलकी श्रम आणि जिद्द त्यांच्या जोरावर जीवन फुलवू शकते.

अशा गावात नक्की एकदा तरी भेट द्यायला हवी. कारण ती आपल्या सांगत आहे की पावसावर अवलंबून सगळं आयुष्य नाही, तर संकटातून मार्ग काढणं म्हणजे खरं आयुष्य. अशाच माहितीसाठी आमच्या digitalpor.in या वेबसाईटला भेट द्या.

हे पण वाचा| महाराष्ट्रातील एक गाव, जिथे दिवस फक्त 6-7 तासांचा असतो. स्वर्गाहून सुंदर आहे. हे ‘गाव’

Leave a Comment