3 जानेवारीपर्यंत व्याजासह पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार, नसता विमा कंपनीवर कारवाई करू कृषिमंत्र्याचे विमा कंपन्यास आदेश Crop insurance new update


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop insurance new update: शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिक विमा देण्याची नियोजन सरकारने केले आहे. त्याच अनुषंगाने रायगड मधील फळपीक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने पिक विमा काढलेल्या असून सुद्धा शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळाला नाही. इतर जिल्ह्यापेक्षा रायगड जिल्ह्यामध्ये फळपीक घेतलेल्या शेतकऱ्यांची मोठी नुकसान झालेली असून त्यांना पिक विमा मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलनाचे महत्त्व लक्षात घेऊन महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या पुढाकाराने कृषिमंत्री यांच्या दालनात रायगड जिल्ह्यातील बाकी असलेल्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पिक विमा कंपनीचे अधिकारी सुद्धा उपस्थित राहिले होते. रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्यामुळे या शेतकऱ्यांचे व्याजासहित पैसे शेतकऱ्यांच्या बँक खाते जमा करा. असा आदेश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आदेश दिले.

Crop insurance new update | फळपीक विमाधारकांना व्याजासह मिळणार पैसे

3 जानेवारी 2023 पर्यंत रायगड जिल्ह्यातील फळपीक धारकांना व्याजासहित पैसे द्यावे असे आदेश कृषी मंत्री यांनी दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळामधील जवळपास 7500 फळपीक भागाचा विमा काढलेला होता यामधील केवळ तीन हजार पाचशे शेतकऱ्यांना पीक कंपन्याकडून नुकसान भरपाई रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना मात्र ही पीक विम्याची रक्कम तांत्रिक मुद्द्यावरून दिली गेली नाही.

हे पण वाचा:-या 17 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात

फळपीक शेतकऱ्याकडून आंदोलन

ज्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी आंदोलन केले. त्यामुळे आता फळ पिक विमा प्रश्न मार्गी लागलेला आहे. बाकी असलेल्या 2940 शेतकऱ्यांना जवळपास 9 कोटी रुपये दिले नव्हते ते आता त्यांना लवकरच मिळणार आहेत.

रायगड मधील प्रत्येक शेतकऱ्यांना तीन जानेवारी 2024 पर्यंत पिक विमा कंपनीने पैसे न दिल्यास कंपनीवर कारवाई केली जाईल असा इशारा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिला. त्यात अनुषंगाने रायगड मध्ये फळ पिक विमा धारकांना लवकर त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असे आश्वासन देखील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.

हे पण वाचा :-कांद्याच्या दरात घसरण सुरूच..! पहा आजचे कांदा बाजार भाव

अश्याच नवनविन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!