Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून राज्यातील पिक विमा कंपनीबाबत शेतकऱ्यांना अनेक तक्रारी आहेत. पिक विम्याचा लाभ मिळत नसल्याचे अनेक तक्रारी मध्ये शेतकऱ्यांनी म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत बैठक बोलावली होती या बैठकीत त्यांनी सर्व शेतकऱ्यांना पिक विमा न दिल्यास मि कंपनी विरोधात एफ आय आर दाखल करीन. अश्या भाषेत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यावर संतापले.
पिक विमा बाबत चाळीस हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून पिक विमा भेटत नसल्याबाबत आरोप करत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. पिक विमा मिळत नाही म्हणून या शेतकऱ्यांनी मुंबई येथे आंदोलन देखील केले होते.
हदगाव तालुक्यातील जवळपास 80 हजार शेतकऱ्यांनी विमा काढला असून त्यातील निम्म्या शेतकऱ्यांना कृषी विभागाकडे पिक विमा न मिळाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे संतापलेले कृषिमंत्र्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खडसावून बजावले.
हे पण वाचा:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 1 तारखी पासून पुन्हा सरसकट कर्जमाफी, या सर्व बँकेत खाते असलेल्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ
महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना द्या! | Crop Insurance Claim
शेतकऱ्यांना पिक विमा देताना कोणते निकष लावले आहेत? ठराविक शेतकऱ्यांना जसा पिक विम्याचा लाभ दिला तसा सर्व शेतकऱ्यांना द्या नाहीतर कंपनी विरुद्ध मी एफआयआर दाखल करतो असा इशारा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
यावेळी बैठकीला उपस्थित कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे च्या या वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता विम्याचे पैसे मिळतील असा दिलासा मिळाला आहे.
मुंबई पार पडलेल्या बैठकीत मंत्री संदीपान भुमरे, खासदार हेमंत पाटील, बाबुराव कदम, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम, विभागीय कृषी आयुक्त आवटे, जिल्हा कृषी अधिकारी, हदगावचे शेतकरी नेते गजानन शिंदे व आत्माराम पाटील, रवी कुमार सूर्यवंशी, राजू पाटील, कृषिमंत्री धनंजय मुंडे हे सर्व उपस्थित होते.
हे पण वाचा:-
अश्याच नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
हा लेख शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद…