Crop Insurance Claim: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आग्रीम 25% पीक विमा मिळाला आहे. उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार? यावरच सर्व शेतकऱ्यांचे लक्ष आहे. पिक विमा वाढीव मिळणार का पिक विमा निकषात काही बदल करण्यात आले आहेत का? उर्वरित पिक विमा मिळणार तर कधी मिळणार? याबाबत कोणकोणत्या अटी असतील? 2023 मधील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा मिळण्याबाबत काही बदल करण्यात आले आहेत. अशा सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.
राज्यातील ज्या शेतकऱ्यांना आग्रीम 25% पीक विमा मिळाला आहे. त्या शेतकऱ्यांना आता प्रश्न आहे की 2023 मधील पिक विमा आणखीन वाढून मिळू शकतो का? सध्याच्या काळात बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा मिळणे मोठे कठीण झाले आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पीक विमा वाढीव मिळणार असे ऐकण्यास आले की थोडे आश्चर्य वाटत.
बऱ्याच कंपन्यांनी अजूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा देखील दिला नाही. यावर्षीच्या हंगाम्यात शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाची गरज होती ती म्हणजे पिक विमा मिळण्याची. शेतकऱ्याच्या शेती पिकाचे यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल अशी आश्या आहे.
सध्याच्या काळात निवडणुकीमुळे आचारसंहिता लागलेली आहे. आशा परिस्थितीत कोणतेतरी सरकार घोषणा करीन की आम्ही शेतकऱ्यांना वाढीव पिक विमा देऊ आम्हाला मतदान करा असे देखील घडू शकते. परंतु हे देखील खरे आहे असे होणे शक्य आहे कारण ज्या सरकारला आपल्याकडे मतदान खेचायचे असेल तर कोणत्यातरी पद्धतीने मतदान घेतले जाऊ शकते. त्यामुळे पिक विम्याच्या मुद्द्यावर त्यांचे जास्त लक्ष असेल.
सध्याच्या काळात राज्यामध्ये एक बातमी सुरू आहे की हे काम करा तरच मिळेल पिक विमा. सध्याच्या काळात शेतकऱ्याच्या नावावरती खोट्या प्रमाणाचा पिक विमा काढून तो पिक विमा कोणत्यातरी दुसऱ्याच व्यक्तीने उचलून घेण्याचे काम सध्या राज्यामध्ये सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे यापुढील पिक विमा हा महाडीबीटी च्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
तेथे क्लीक करुन पहा वाढीव पिक विमा मिळणार का..?
Crop Insurance Claim: पिक विम्याच्या वितरणात हा एक मोठा बदल करण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोट्यावधी रुपयाचा पिक विमा हा शेतकऱ्यांच्या नावावरती भरून आतापर्यंत बाहेर काढण्यात आला आहे. पिक विमा कंपनीच्या नफ्याला लगाम घालत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या निकषात बदल झालेला आहे.
पिक विमा योजनेत शेतकरी योजना विमा कंपन्यांना मोठा फायदा होतो असा आरोप नेहमी केला जात होता. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई देण्याच्या निकषात मोठे बदल केले आहेत. या नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना अधिक प्रमाणात पीक विमा मिळेल असा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.
खरीप पिक विमा 2023 मधील शेतकऱ्यांना नवीन निकषानुसार देण्याचे आदेशही विमा कंपन्यांना कृषी विभागाने दिले आहेत. परंतु आता प्रश्न येतो तो म्हणजे यांनी कशामध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत हा. शेतकऱ्यांना जर पिक विमा मिळवायचा असेल तर त्यांची कागदपत्रे ही पिक विमा कंपनीकडे जमा करावी लागत होती आणि पिक विमा कंपनी त्या कागदपत्राचे काय करते? हे शेतकऱ्यांना काही समजत नव्हते.
परंतु आता केंद्र सरकारने पिक विमा कंपनीला जाहीरपणे सांगितले आहे की जे काही माहिती तुम्ही शेतकऱ्यांची घेतलेली आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर झाला आहे. तो ताबडतोब शेतकऱ्यांना द्यावा. व विमा वाटल्यानंतर सर्व माहिती केंद्र सरकार महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करणार आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आपण आपली सर्व माहिती कधी पण पाहू शकतो. म्हणजे आपला पिक विमा किती मंजूर झाला तो कधी मंजूर झाला आणि तू कधी मिळणार अशा सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी मिळणार आहे.
हे पण वाचा:-सोने झाले खूपच स्वस्त, पहा आजचे 10 ग्रॅम सोन्याचे भाव
1 thought on “Crop Insurance Claim: या तारखेला मिळणार उर्वरित 75 टक्के पिक विमा? पिक विमा निकषात झाले बदल, पहा सविस्तर माहिती”