Crop Insurance | पिक विमा बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामधील सोयगव तालुक्यातील पिक विमा काढलेल्या 18 हजार 540 शेतकरी संमती पत्र न जोडल्यामुळे अपात्र करण्यात आलेले आहेत. या तालुक्यातील शेतकऱ्यांचे मका कापूस सोयाबीन व इतर पिकांची पिक विमा ची प्रस्ताव पिक विमा कंपनीने अपात्र ठरवलेले आहेत.
अपत्र ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय यादी सीसी केंद्राकडे पाठवण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संताप व्यक्त होत आहे.
राज्यामध्ये आधीच सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच सोयगाव या तालुक्यामध्ये शासनाच्या माध्यमातून दुष्काळ परिस्थिती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच 54 हजार शेतकऱ्यांनी कपाशी, मका,सो याबीन, ज्वारी, उडीद, बाजरी, मूग, तूर आधी खरीप हंगामा मधील पिकांचा 2023 वर्षाचा विमा काढलेला होता.
खरीप हंगामाचा पिक विमा मंजूर होण्याचा कालावधी असताना पिक विमा कंपनीने सामूहिक क्षेत्रामधील पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी संमती न दिल्याने प्रस्ताव रद्द करण्यात आलेले आहेत. त्यामुळे तालुक्यामधील महसुली दप्तरणीय समाईक क्षेत्र असलेल्या 18 हजार 540 शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पिक विमा मधून आर्थिक फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
राज्यामध्ये आधीच दुष्काळाच्या झळा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे त्यामध्ये पुन्हा रब्बी हंगामाच्या उन्हाळी पिकी ही कुणाच्या तीव्रतेने होरपळले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पीक विमा कंपनीने नवीनच फंडा वापरून सामूहिक क्षेत्राच्या संमतीचे कारण पुढे करत तालुक्यातील प्रमुख पिकांचे पिक विमा प्रस्ताव ना मंजूर केलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.