Cotton Rate | यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने काही भागांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कापूस उत्पादनामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये घट झाली आहे. मात्र तरीही यावर्षी चांगला बाजार भाव मिळेल अशी आशा बाळगून शेतकरी पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाची लागवड केली होती.
यंदा सरासरीपेक्षा उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे शेतकऱ्यांना शेवटी की यंदा कापसाला चांगला भाव मिळेल. परंतु अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेतीला खर्च केलेला ही निघत नाही अशी चिंता शेतकरी वर्ग मधून व्यक्त होत आहे. मराठवाडा विदर्भ व खानदेशया भागात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जाते.
शेतकऱ्यांनी कष्टांनी पिकवले कापूस पुन्हा एकदा शेतकऱ्याचा पदरात निरशा पाडून गेला. पुन्हा शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुरडा झाला आहे. खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस तसेच दुष्काळ परिस्थिती अवकाळी पाऊस व गारपीट यासारख्या संकटामुळे कापूस पीक पूर्णपणे उध्वस्त झाले. या सर्व संकटातून शेतकऱ्यांनी त्यांची पिक वाचवली.
मात्र उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आली आहे. शिवाय सद्यस्थितीला कापसाला बाजारात मी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये कापसाला पाच हजार पाचशे रुपये ते 6 हजार 600 रुपये भाव मिळत आहे.
शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी त्यांचा कापूस घरामध्ये साठवून ठेवला आहे. या चालू आठवड्यामध्ये कापूस बाजार भाव मध्ये तब्बल चारशे रुपयांची घसरून पाहायला मिळाली आहे. परंतु दरवर्षी दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढत असतात. परंतु या वर्षी असे काही घडले नाही.
शेतकऱ्यांना अपेक्षा होती की दिवाळीनंतर कापसाचे भाव वाढतील परंतु भाव अजूनही दबावतच आहेत. परंतु अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची व महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
अवकाळी पावसानंतर बोंड अळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे त्यामुळे चांगला कापूस बाजारामध्ये मिळत नसल्याने बाजार भाव मध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकीकडे कापसाचे मागणी वाढू लागले तर दुसरीकडे कापसाचे उत्पादन कमी आहे.
याच संदर्भामध्ये तज्ञांनी काही अंदाज बोलवला आहे. बाजारामध्ये चांगला कापूस मिळत नसल्याने बाजार भाव वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तज्ञांच्या मते फेब्रुवारीच्या 21 किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरामध्ये सुधारणा होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
तज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार कापसाचे भाव जवळपास सात हजार रुपये प्रति क्विंटल किंवा यापेक्षा अधिक होतील अशी अशा व्यक्ती केली आहे. आता हा अंदाज खरा ठरतो का याकडे पाहण्यासारखे राहणार आहे व बळीराजाला आधार मिळतो का.