सरकारचा मोठा निर्णय, पांढर सोन पुन्हा एकदा चमकणार ? सीसीआयच्या माध्यमातून कापसाला मिळणार योग्य भाव

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate | महाराष्ट्र मध्ये कापूस पिकं मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जाते. विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील विभागामध्ये लावले जाणारे एक प्रमुख पीक आहे. कापूस पिक शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामातील या पिकावर राज्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. बऱ्याच दिवसापासून दबावत असलेले कापूस दर पुन्हा एकदा वाढणार का ? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.

( शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp 70571 47283 नंबर तुमच्या गावातील ग्रुप मध्ये ऍड करा )

यंदा सरासरीपेक्षा राज्यामध्ये कमी पाऊस झाल्याने अनेक पिकाप्रमाणे कापूस उत्पादनामध्येही घट झाली आहे. याच कारणामुळे शेतकऱ्यांना अशा होती की, त्यांच्या पिकाला चांगला दर मिळेल. परंतु शेतकऱ्याच्या कापसाला बाजार मध्ये योग्य दर मिळत नाही. अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मराठवाड्यातील परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी सुरू होणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे कापूस भाव वाढणार का असा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.सीसीआयच्या माध्यमातून कापूस खरेदी झाल्यानंतर कापूस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य भाव मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बाजार समितीमध्ये प्रशासनाने लवकर अशी केंद्र कार्यान्वित होणार असे यावेळी सांगितले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कष्टाने पिकवलेला पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाला होता. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सीसीआयकडून कापूस खरेदी होत नसल्याने या परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा अडचणीचा सामना करावा लागत होता.

परंतु आता या पाठपुरावाला यश आल्यामुळे या चालू हंगामामध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू होणार आहे. या कारणामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला योग्य भाव मिळू शकणार आहे. या माध्यमातून खरेदी केल्यास शेतकऱ्यांना मोठा आदर मिळणार आहे अशी अशा व्यक्त होत आहे.

लवकरच शेतकऱ्याच्या पांढरे सोने पुन्हा एकदा चमकणार, आणि शेतकऱ्यांच्या घामाला यश मिळणार का ? याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!