Cotton Market Price | यंदा हंगामाच्या सुरुवातीला कापूस भाव दबावत होते. मागच्या दोन वर्षापासून कापूस दर हे कमी झाले. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात हतबल झाला आहे. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी कापूस पिकाबद्दल निराशा व्यक्त करत आहेत.
यंदा राज्यामध्ये सरासरीपक्षा कमी पाऊस झाल्याने अपेक्षित असे उत्पादन देखील झाले नाही. त्यातच सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा देखील कमी भावाने कापूस विक्री करावा लागल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
तसेच कापसाला महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच दर्जा आहे. कापूस हे महाराष्ट्र मधले पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. याचे उत्पादन महाराष्ट्र मध्ये खानदेश मराठवाडा विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पिकावर या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. परंतु यंदा राज्यामध्ये सरासरी पेक्षा पाऊस न झाल्यामुळे कापूस पिकामध्ये उत्पादनात घट झाली आहे.
मागच्या दोन वर्षांपूर्वी पांढरे सोन्याला दहा हजार ते बारा हजार रुपये क्विंटल असावी विक्रमी दर मिळाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदाही चांगला दर मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु शेतकऱ्यांना यावर्षी कापूस पिकाने चांगलाच दगा दिला आहे.
शेतकऱ्यांवर सध्या दुष्काळाचे सावट असल्यामुळे शेतकरी वर्ग मोठा अडचणी सापडला आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होणाऱ्या भीतीने शेतकरी टोकाच्या पाऊल उचलत असतात.
मागच्या दोन वर्षाचा विचार केला तर शेतकऱ्यांना अपेक्षित असा दर मिळाला होता. परंतु या चालू हंगामाबद्दल सांगायचे झाल्यास विजय दशमीच्या च्या पिरेडमध्ये कापसाला सात हजार पाचशे रुपये प्रतिक्रसा दर मिळत होता.
परंतु गेल्या आठवड्यापासून पुन्हा एकदा परिस्थिती लागली आहे. हंगाम चे शेवट का होईना पण कापसाचे बाजारभावामध्ये सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
राज्यातील देऊळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला विक्रमी दर मिळाला आहे. इथे झालेले लिलावात कापसाला आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे. विशेष म्हणजे देऊळगाव बाजार समितीमध्ये आतापर्यंत मिळालेला हंगामातील सर्वाधिक दर असल्याचे दावा करण्यात आला आहे.
तसेच अकोला जिल्ह्यामधील बोरगाव मंजू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपये. तर किमान 7300 आणि सरासरी 7650 रुपये प्रति गुंतला सादर मिळाला आहे तसेच अकोट बाजार समितीमध्ये आज किमान 7500 तर कमल 8200 रुपये प्रति गुंतला सदर मिळाला आहे तसेच सर्वसाधारण आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.