Cotton Market | कापूस हे महाराष्ट्र मधले प्रमुख पीक आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस पिकाचे उत्पादन केले जाते. या भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक जीवन या पिकावर अवलंबून आहे. या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे तज्ञांच्या मते कापसाला भाव मिळणार की नाही ते आपण जाणून घेणार आहोत.
मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादना मध्ये मोठी घट झाली आहे. तरीदेखील कापसाचे भाव दबावत आहेत. शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणी मध्ये सापडला आहे.
यंदा हंगामामध्ये कापूस पिकाला सात हजार इतका हमीभाव जाहीर करण्यात आला. परंतु जाहीर करण्यात आलेला हमीभाव अपेक्षाही कापूस कमी किमतीमध्ये खरेदी होत आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत दिसून येत आहे.
सध्या बाजारामध्ये कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते 7200 पर्यंत दर मिळत आहे. सध्याचे दर पाहता शेतकऱ्यांना दहा हजार रुपये बाजार भाव मिळण्याची आशा आहे. आतापर्यंत 40 ते 50 टक्के शेतकऱ्यांनी कापसाची विक्री पूर्ण केली आहे.
पावसाचा खंड नोव्हेंबर महिन्यात झालेला अवकाळी पाऊस या सर्व गोष्टीमुळे शेतकऱ्याच्या हाता तोंडाशी आलेला घास गेला आहे. कापसाच्या उत्पादनामध्ये मोठी घसरण झालेली आहे. तरीही बाजार भाव खूपच कमी आहेत.
परंतु पुढील काळामध्ये कापसाचे भाव कसे राहतील किंवा कापसाचे भाव वाढतील का याबाबत अभ्यासकांनी मोठे वक्तव्य केले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी चांगला कापूस 7500 रुपये क्विंटल च्या कमी विकू नये असे मत व्यक्त केले आहे. व या मुलाखती त्यांनी बोलत असताना असे सांगितले की बाजारातील तज्ञांनी दिलेल्या माहितीवर जास्त काळ अवलंबून राहू नये. कापसाचे भाव वाढत असल्यास तात्काळ शेतमालाची विक्री करावी.