Cotton Market | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या हा काळ मोठा संकटाचा आहे. कारण यंदा राज्यामध्ये शेतकऱ्यांवरती मोठा डोंगर कोसळला आहे. राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस त्यामध्ये दुष्काळ परिस्थिती अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपीट अशा संकटामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Today’s cotton market price
अशा स्थितीत बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
परंतु राज्यातील कापूस दर काही दिवसांपासून घसरले होते शेतकऱ्यांना हमीभाव देखील मिळणे मुश्किल झाले होते. परंतु अशाच शेतकऱ्यांसाठी काही दिलासा दायक सुधारणा दिसून आली आहे.
बुलढाणा जिल्ह्यामधील देऊळगाव बाजार समितीमध्ये कापसाला सर्वाधिक दर मिळाला आहे. इथे कापसाला सर्वाधिक 7500 ते कमीत कमी सहा हजार सहाशे तसेच सर्व साधारण सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
बाजार समितीमध्ये समाधानकारक दर मिळत असल्याने देऊळगाव राजा बाजार समितीत आलेल्या विक्रीसाठी शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. बाजार समितीमध्ये आज एकूण 3160 क्विंटल कापसाची आवक झाली.
कुठे मिळतोय समाधान कारक Today’s cotton market price
आज वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट बाजार समितीमध्ये दहा हजार क्विंटल कापसाचे आवक झालेली आहे. इथे कापसाला कमाल 7300 दे किमान सहा हजार रुपये इतका दर मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेलु बाजार समितीमध्ये आज 2640 क्विंटल कापसाचे आवक झालेले असून कमाल 7255 ते किमान 6550 ते सरासरी 7150 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
आजचे राज्यातील कापुस बाजार भाव Today’s cotton market price in the state
आजचा बाजार भाव जाणून घेण्यापूर्वी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला दररोज शेती विषयक माहिती लवकरात लवकर मिळेल.
अकोला बाजार समितीमध्ये 101 क्विंटल कापसाचे आवक झाली आहे. इथे कमाल 7000 ते किमान 6,930 रुपये तर सर्वसाधारण सहा हजार 965 रुपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला आहे.
तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती बाजार समितीमध्ये ३८० क्विंटल कापसाचे आवक झाली आहे. तिथे कमाल सहा हजार नऊशे ते किमान 6200 तर सरासरी 650 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे. तसेच नागपूर जिल्ह्यातील उमरेड बाजार समितीमध्ये कापसाची पाचशे आठ क्विंटल आवक झालेली आहे. इथे कमाल 6890 ते किमान 6500 रुपये तसेच सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला आहे.