Cotton Market | कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कापूस पिकाला अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निरशा जनक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, देशातील अनेक बाजारामध्ये सुधारणा झाल्याची दिसून येत आहे. कापूस पिक महाराष्ट्र गुजरात कर्नाटक तसेच उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
अशाच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कापसाचे भाव क्विंटल माझं अनेक बाजारामध्ये शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले आहे. तसेच येत्या काळामध्ये कापसाचे भाव मागणीवर आणि आवक वर अवलंबून राहणारा असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
देशातील कापसाची आवक कमी होत असल्याने कापसाच्या दरामध्ये सुधारणा होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. देशाच्या आवकेचा विचार केला तर देशात एक लाख 30 हजार गाठी कापूस विक्रीसाठी आल्या होत्या. म्हणजेच बाजारामध्ये आवक सात लाख गाठींनी कमी झालेले आहे.
या आवके मध्ये गुजरात आणि महाराष्ट्राचा मोठा मोलाचा वाटा आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बाजार मध्ये झालेली आवक सर्वाधिक आहे. महाराष्ट्र मध्ये बाजारात 47 लाख गाठी कापूस विक्रीसाठी आला होता. तर गुजरात मध्ये चाळीस लाख कापूस विकला गेला. तसेच देशातील इतर राज्यांमध्ये पन्नास हजार गाठींची आवक होती असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने स्पष्ट केलेले आहे.
या बाजार समितीमध्ये मिळाला सर्वाधिक दर
तसेच राज्यातील सर्वाधिक भाव सात हजार पाचशे रुपये होता. बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा बाजार समिती हा भाव मिळाला आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जागतिक बाजारामध्ये कापसाचा भाव वाढला आहे. कोटलुक ए इंडेक्स ९९.५० सेंट प्रीती पाउडर पोहोचला. कुंटल मागे आणि रुपयात चांगले झाले तर जागतिक बाजारात प्रत्यक्ष कापूस म्हणजे रुई खरेदीचे भाव 18हजार 250 रुपये प्रतिक्विंटल होतात.
तर देशाची रुईचा भाव काहीसा वाढला आहे. रुईचा भाव मागील चार दिवसांमध्ये क्विंटल मागे तीनशे रुपये वाढला होता. रुईचा आजचा भाव सोळा हजारावर पोहोचला म्हणजे प्रत्यक्ष रुईचे खिरवीचे आंतरराष्ट्रीय बाजारातील पेक्षा दोन हजार 250 रुपयांनी जास्त आहेत.