Beneficiary Status: देशभरातील शेतकरी सध्या पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वाजता कधी मिळणार याबाबत माहिती मिळालेली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी विहार दौऱ्यावर असताना या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री मोदी किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता जमा करणार आहेत. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातील जवळपास 13 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होत आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करावे लागणार आहे. हे काम केले नाही तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत.
हे पण वाचा | फार्मर आयडी शेतकऱ्यांसाठी ठरणार मोठ्या फायद्याची; याद्वारे मिळणारी 5 महत्त्वाचे मोफत फायदे
पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. नियमानुसार ई केवायसी करणे अतिशय आवश्यक आहे. जर तुम्ही ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केले नाही तर तुम्हाला या योजनेचा हप्ता मिळणार नाही. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ओटीपी द्वारे प्रक्रिया पूर्ण करायची आहे. Beneficiary Status
जर तुम्ही अजून देखील नसेल तर ते करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय म्हणजे जवळच्या सीएससी केंद्रात भेट देऊन पीएम किसान योजनेची ई केवायसी ऑनलाईन पद्धतीने करून घेणे. देशभरातील करोडो शेतकरी 19व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु ई केवायसी प्रक्रिया आणि जमीन पडताळणी पूर्ण न केल्यास हा हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही. त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता देखील मिळेल.
हे पण वाचा | महिलांना लखपती करत आहेत ‘या’ सरकारी योजना; तुमच्यासाठी कोणती योजना फायद्याची?
त्याचबरोबर या योजनेबाबत काही नवीन नियम देखील लावण्यात आले आहेत. त्यानुसार एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असतील तर आता फक्त एकाच सदस्याला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. शेतकऱ्यांनी देखील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे नियमावली तपासून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना सरकारच्या या अतिशय महत्त्वकांशी योजनेचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांनी वरील प्रक्रिया पूर्ण केले आहेत त्यांनाच 19 वा हप्ता मिळणार आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा