10 लाख शेतकऱ्यांना 50 कोटी कधी देणार सरकार? अग्रीम पिक विम्या पासून शेतकरी वंचित Agrim Pik Vima

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agrim Pik Vima: प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून राज्यात 24 जिल्ह्यांमध्ये 50 लाख शेतकऱ्यांना 2206 कोटी रुपयाची अग्री नुकसान भरपाई जाहीर झाली होती. पण रक्कम दिवाळीपूर्वी सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यावर जमा होईल असे आदेश पिक विमा कंपन्यांना सरकारने दिले होत.

पण दिवाळीनंतरही काही महिने ओलांडून अजूनही 13 लाख 80 हजार 983 शेतकरी पिक विम्याच्या 500 कोटीच्या अग्रीम पिक विमा योजनेपासून वंचित आहेत. यावर पिक विमा कंपन्यांनी सरकारांचा आदेश कचऱ्याच्या पेटीत टाकल्याप्रमाणे स्पष्ट दिसून येत आहे. सरकारने आदेश दिलेला असून पिक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खाते त्यांच्या हक्काची पिक विम्याची रक्कम जमा अजूनही केली नाही.

पिक विम्याचे तरतुदीनुसार पावसाचा 21 दिवसापेक्षा जास्त खंड उत्पन्नात 50 टक्के पेक्षा जास्त घट असल्यास नुकसान भरपाई द्यावी लागेल. पिक विमा वितरण कंपनीकडून १८ डिसेंबर पर्यंत 36 लाख 7400 शेतकऱ्यांना 1000710 कोटीची आग्रिम पिक विमा वितरित केला आहे. अद्याप 498 कोटी 99 लाखाचे अग्रीम वितरण झाले नाही.

हे पण वाचा : या शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी, सरकारने नवा नियम जारी केला आहे, पहा सविस्तर माहिती

Agrim Pik Vima

अग्रीम पिक विमा पासून वंचित शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक 7 लाख 15 हजार 250 शेतकरी नांदेड जिल्ह्यातील आहेत. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडून 255 कोटी 60 लाख रुपयांची अग्रीम पिक विमा रक्कम दिलेली नाही. तर छत्रपती संभाजी नगर मधील दोन लाख 99 हजार 410 शेतकऱ्यांना चलो मंडळ कंपनीकडून 84 कोटी 70 लाख एवढी रक्कम अजून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे.

राज्यातील 95 हजार 320 शेतकऱ्यांना हजार पेक्षाही कमी अग्रीम रक्कम मिळाली आहे. पिक विमा कंपनीने जाणून बुजून शेतकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. म्हणजेच एक हजार रुपयांच्या हिशोबाने जेवढे शेतकऱ्यांना ही रक्कम जमा केली जाईल तेवढे शेतकऱ्यांची संख्या वाढते ही संख्या सरकारला दाखवण्यसाठी पुरेशी आहे. श्री रक्कम सहा कोटी 92 लाख 50 हजार आहे. यामध्ये सर्वाधिक 12486 शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील आहे तर जालना जिल्ह्यातील 11 हजार 87 शेतकरी आहेत.

शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक नसल्याने अडकले 68 कोटी: दरम्यान आधार क्रमांक खात्याशी जोडलेलं नसल्यामुळे एक लाख 64 हजार 29 शेतकऱ्यांना 68 कोटी 70 लाख 65 हजार अग्रीम पिक विमा वाटण्यात अडचण आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :-शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! महाराष्ट्रात पुन्हा शेतकरी कर्जमाफी होणार, वाचा सविस्तर माहिती

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment