Agrim Nuksan Bharpai : नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा उतरवलेल्या सोयाबीन मका आणि बाजरी पिकांच्या सर्व पात्र शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.
ऑगस्ट 2023 मध्ये सरसरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील खरीप पिक विमा योजना 2023 अंतर्गत खरीप उत्पादन झालेल्या घट लक्षात घेऊन. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पिक विमा कंपनीला संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या पंचवीस टक्के आगाव रक्कम देण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील 92 महसूल मंडळी आणि आठ तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांना विमा उतरवला आहे मात्र पिक विमा कंपनी मार्फत निर्णय झाला नाही.
पिक विमा कंपनीला जिल्हास्तरीय बैठकांमध्ये तसेच लेखी पत्रद्वारे वारंवार सूचना देण्यात आलेले असून कृषी विभागाच्या अपर मुख्य सचिव कृषी आयुक्त यांच्याशी दूरध्वनी द्वारे तसेच कृषी मंत्री व पालकमंत्री चर्चा केली आहे. तसेच जिल्हा अधिकारी आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला आहे.
अखेर केलेल्या पाठपुराव्याला यश आलेले आहे. विमा कंपन्यांनी सोयाबीन बाजरी आणि मका पिकांसाठी आगाव रक्कम मंजूर केली. त्यानुसार शेतकऱ्यांना 25 टक्के आगाव रक्कम देण्यात येणार असून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पासून विमाधारक शेतकऱ्यांना त्यांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अध्यक्ष दत्तात्रेय गावसाने यांनी सांगितली.
सध्याही रक्कम सोयाबीन बाजार आणि मका पिकांसाठी पहिला टप्प्यात मंजूर करण्यात आलेली आहे. कृषी अध्यक्ष गावसाने म्हणाले उर्वरित पिकांची नुकसान भरपाईसाठी श्री गावसाने आणि पाठपुरावा करत असून लवकरच पिकांसाठी पिक विमा कंपनी आगाव रक्कम मंजूर करेल अशी माहिती दिली आहे.