Agriculture News | अकोला जिल्ह्यामध्ये 2023 च्या नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपोटीमुळे एक लाख 89 हजार 681 हेक्टर शेतपिंकांचे नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई पुरुष शासनाच्या माध्यमातून 332 कोटी 96 लाखांची आर्थिक मदत मंजूर केलेली आहे.
यासाठी नुकसानग्रस्त दोन लाख 46,188 शेतकऱ्यांपैकी एक लाख 80 हजार 181 शेतकऱ्यांच्या याद्या तैशिष्टरावरून पोर्टलवर अपलोड करण्यात आलेले आहे. जवळपास 75 टक्के शेतकऱ्यांच्या यादी अपलोड झालेले आहे.
जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्याच्या कॅरेट झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने एक हजार 752 गावातील 2 लाख 46 हजार 188 शेतकऱ्यांचे एक लाख 89 हजार 681 वरील हरभरा, ज्वारी, तूर, कापूस, गहू, भाजीपाला, कांदा, केळी, पपई, लिंबू, आंबा, मोसंबी, पेरू या पिकांचे नुकसान झाले होते.
या नुकसानीचे कृषी महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्त पंचनामे केलेली. त्यानुसार नुकसानग्रस्त राज्य सरकारने आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून निकषाच्या बाहेर जाऊन तीन हेक्टर मर्यादित्य पर्यंत मदत देण्याचे निर्देश दिलेले आहेत. 31 जानेवारी रोजी राज्याचा महसूल व वन विभागांनी 333 कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे.
तसेच जिल्ह्यातील शेतीसाठी याआधी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत दिली जात होती. त्याऐवजी आता 13500 मदत दिली जाणार आहे. तसेच बागायती पिकासाठी हेक्टर या 17000 रुपये मदत दिली जात होती. आता 27 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. बहुवार्षिक फळ पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 22500 मदत दिली जात होते. आता 36 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. या याद्या अपलोड झालेल्या मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.