Agriculture News | आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने आणखी काही महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आता मंडळातील सर्व सवलती लागू करण्यात येणार आहेत.
शेतकऱ्यांना दुष्काळ प्रसिद्ध लाभ मिळावा यासाठी शासनाने दुष्काळ दृश्य जाहीर केलेल्या महसूल मंडळातील विभाजन करून नव्याने करण्यात आलेल्या नवीन मंडळातील दुष्काळ दृश्य परिस्थिती शासनाने जाहीर केलेली आहे. 19 जिल्ह्यामधील 224 मंडळामध्ये याचा समावेश आहे. आधी प्रमाणे नव्याने जाहीर केलेल्या दुष्काळ सदृश्य मंडळामध्ये सर्व सवलती तातडीने लागू केल्या आहेत.
राज्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसामुळे दुष्काळ स्थिती निर्माण झालेल्या चाळीस तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासनाने दुष्काळ सवलती जाहीर केल्या होत्या. परंतु आणखी पुन्हा त्यांच्या असलेल्या ज्या महसूल मंडळात जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस व एकूण प्रजन्य 750 मिलिमीटर पेक्षा कमी झाली आहे.
अशा 1021 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली तिथे सवलती लागू केल्या. या 1021 मंडळापैकी जय मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आणि त्याचे मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले नाही.
अशी नवीन महसूल मंडळी देखील दुष्काळ सदृश्य मंडळी म्हणून जाहीर करावी तसा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यानुसार 19 जिल्ह्यातील 224 नवीन मंडळी दुष्काळ सदृश्य घोषित करण्यात आले आहेत. नव्याने जाहीर दुष्काळ सदृश्य मंडळ नगर जिल्ह्यात सर्वाधिक 36 त्या फोटो पाठ धुळ्यातील 23 तसेच जळगाव जिल्ह्यामधील 24 मंडळाचा समावेश आहे.
दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना या सवलती मिळणार
- जमीन महसुलात सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठण
- शेतीशी निगडित कर्जाच्या वसुली स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू वीज बिलात 33.5 टक्के सूट
- शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
- रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टॅंकर चा वापर
- शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे.