Agriculture Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात सकाळच्या सत्रात वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये 28 हजार 315 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. यामध्ये असे निदर्शनात आले आहे की कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून आज कांद्याला सर्वसाधारण 975 ते 1400 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत भाव मिळाला आहे.
नाशिक बाजार समितीमध्ये लाल आणि पोळ कांद्याची आवक झाली आहे. लालसगाव विंचूर बाजार समितीत आज 11500 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. लाल कांद्याला प्रतिक्विंटल सर्वसाधारण 1280 रुपये भाव मिळाला असून पोळ कांद्याला सर्वसाधारण 1300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे.
पुण्यात पाहिलं तर पिंपरी व मोशी बाजार समितीत लोकल कांद्याची आवक झाली असून क्विंटल मागे 800 रुपये ते 1000 रुपये दर मिळाला आहे. कराड बाजार समितीत आज हालवा कांद्याची आवक झाली असून १०० क्विंटल कांदा बाजारात दाखल झाला आहे. या कांद्याला प्रति क्विंटल 1400 रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे.
पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला भाव?
आजचे कांदा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
सोयाबीनच्या बाजार भाव सुधारणा..! | Agriculture Market Price
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोयाबीनच्या दरात सुधारणा होताना दिसून येत येणाऱ्या काही दिवसात सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात 1560 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. यामध्ये पिवळा पांढरा आणि लोकल सोयाबीनला सर्वसाधारण 4100 ते 4600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
लातूर बाजार समितीत आज 255 क्विंटल पांढऱ्या सोयाबीनची आवक झाली आहे. तर या बाजार समितीत 4400 रुपये प्रतिक्विंटल सर्वसाधारण दर मिळाला आहे. नागपूर बाजार समितीत लोकल सोयाबीनची 460 क्विंटल आवक झाली असून, या ठिकाणी सर्वसाधारण 4290 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे.
पहा कोणत्या बाजार समितीत किती मिळाला दर?
आजचे सोयाबीन बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण वाचा:- सोन्याच्या दरात मोठा बदल..! पहा आजचे 10 ग्राम सोन्याचा भाव
3 thoughts on “सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा पण कांद्याच्या भावात घसरण..! पहा आज सोयाबीन, कांद्याला काय मिळतोय भाव?”