शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! पांढऱ्या सोन्याला मिळणार 8000 भाव? तज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kapus Bajar Bhav | कापूस हे महाराष्ट्र मध्ये उत्पादन होणारे नगदी पीक आहे. याचे उत्पादन महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विदर्भ मराठवाडा खानदेश या भागातील शेतकऱ्यांचे या पिकावरती अर्थकारण अवलंबून आहे.

बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच येत होती. परंतु अशातच शेतकऱ्यांसाठी दिलासा एक बातमी समोर येत आहे ती म्हणजे कापूस भाव सुधारणा. तज्ञांच्या मते येत्या काळामध्ये कापसाचे भाव आठ हजार होणार आहे.

यंदा राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने महाराष्ट्राच्या काही भागात दुष्काळ सुदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा जनक परिस्थिती निर्माण झाली होती.

राज्यात चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करून तिथे शेतकऱ्यांसाठी दुष्काळ सवलती लागू करण्यात आलेले आहेत परंतु. मालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांचा कापूस हमीभाव अपेक्षा कमी दरामध्ये विकावा लागत होता.

अशातच तज्ञांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. येत्या काळामध्ये कापसाचे दर आठ हजारांचा टप्पा पार करतील आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य दर मिळेल अशी आशा आता शेतकऱ्यांमधून व्यक्त होऊ लागली आहे. पण तज्ञांनी काय सांगितले याकडे पाहणे महत्त्वाचे आहे ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

तज्ञांनी दिली मोठी माहिती Cotton market price information

आपण मागच्या एका महिन्यापासून सातत्याने चर्चा करत होते की फेब्रुवारी महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव मधील चित्रे दोन गोष्टीमुळे बदलू शकतात. आता कापसाच्या भावा मध्ये तेजी येण्यास सुरुवात झाली आहे. कारण कापसाचे भाव क्विंटल मागे दोनशे रुपयांनी वाढले.

आता पुढील महिनाभरात कापसाचे भाव सात हजार पाचशे रुपयांचा टप्पा घाटू शकतो. महिन्यापर्यंत कापसाचे दर आठ हजार ंची पातळीवर पोहोचू शकतो. पण कापसाचे भाव एवढे वाढलेला नेमकं कारण काय हा प्रश्न आपल्या मनात आला असेल तर यावरच आपण सविस्तर माहिती दिली आहे.

कापसाचे भाव वाढण्याचे कारण काय ? What is the reason for the increase in the price of cotton?

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कापसाचे बाजार भाव वाढण्याचे मुख्य दोन कारण आहेत. पहिलं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारभावामध्ये सुधारणा व दुसरे कारण म्हणजे अपेक्षित असा कापूस उपलब्ध होत नसल्यामुळे दरामध्ये सुधारणा होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. तसेच मार्च महिन्यामध्ये कापसाचे दर दहा टक्के ने वाढतील. आता याकडे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे की शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेल्या कापसाला योग्य दर मिळतो का.

Leave a Comment

error: Content is protected !!