सोयाबीनच्या भावात चारशे रुपयांची घसरण! बाजारभाव पडण्याचे नेमके कारण काय ? वाचा सविस्तर

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Rate : सोयाबीन हे राज्यांसह संपूर्ण देशभरात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. शेतकरी बांधव याला पिवळं सोना म्हणून ओळखतात. या पिकातून भरपूर असे उत्पादन व उत्पन्न मिळत, असल्याने या शेती पिकाची शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची ठरते.

पण गेल्या दोन वर्षांचा विचारं केला तर सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा भाव मिळतं नसल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे बळीराजाचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे उत्पादन घेतले जाते.

भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनापैकी जवळपास 40% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. यावरून राज्यातील शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण या पिकावर अवलंबून असल्याचे स्पष्टपणे पाहायला मिळते. दरम्यान सोयाबीनलाच गेल्या दोन वर्षापासून चांगला भाव मिळतं नसल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत आहे.

या चालू हंगामातील ही मालाला चांगला भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. खरीप हंगामामध्ये कमी पाणी आणि हवामानात सातत्याने बदल होत, असल्यामुळे अधिकचा खर्च करून सोयाबीनचे पीक जोपासले आहेत. मात्र खर्च अधिक झाला तर उत्पादन खूपच कमी मिळेल.

काही शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकातून दोन ते तीन क्विंटलचा एक करी उतारा मिळाला आहे. शिवाय बाजारात सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळत नाही. गेल्या आठवड्यापूर्वी बाजारभावात 400 रुपयांची वाढ झाली होती. यामुळे आगामी काळात आणखीन भाव वाढतील अशी आशा होती.

पण, झाले याच्या उलट सोयाबीन दर 4,900 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात 5,300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळत होता. म्हणजेच बाजारभावात 400 रुपयांची घसरणं आली आहे‌. सोयाबीनला 4,600 चा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. अर्थातच सध्याचे भाव आम्ही भावाच्या आसपासच आहेत.

उत्पादनात घट आणि बाजारभावातील मंदी यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे सोयाबीन दरात घसरण का होत आहे. हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. म्हणून आता बाजारभावात घसरल होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, हे आपण समजून घेऊया.

बाजारभावात घसरण होण्याचे कारणे.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे दिवाळीनंतर बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या मागणीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. तसेच तांदूळ पेंडीच्या निर्यातीवरील बंदीला एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.

सोयाबीन चे भाव वाढले, तर सोयापेंडलाही निर्यात बंदी येऊ शकते. अशी भीती असल्याने सोयाबीनचे भाव जाणून-बुजून दबावात ठेवले जात आहे. याशिवाय केंद्र सरकारने सर्वसामान्यांना स्वस्त दरात खाद्यतेल उपलब्ध व्हावे यासाठी खाद्यतेलांवर आयात शुल्क लागू केलेले नाही.

परदेशातून मोठ्या प्रमाणावर खाद्यतेल आपल्या देशात आयात होत आहे. देशात आफ्रिकेतील खाद्यतेल मोठ्या प्रमाणात दाखल होत आहे. म्हणून देशांतर्गत खाद्यतेलाचे भाव वाढत नाही. त्यामुळे सोयाबीनचे दर दबावात असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment