Khandkari Shetkari : खंडकरी शेतकऱ्यांच्या नावावर होणार जमीन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Khandkari Shetkari : शेती महामंडळाकडून मूळ खंडकरांना जमीन देताना दिलेल्या भोग वाटोदार वर्ग दोन वरून भोगवटा एक करण्याचा मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला असल्याने खंडकरी शेतकऱ्यांना जमिनीचा मालकी हक्क प्राप्त होणार आहे.

याबाबत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत पाठपुरावा केलेला होता. शेतीमाम शेती महामंडळाकडून मूळ खंडक्र्याना जमीन देताना भोगवटादार वर्ग दोन म्हणून सो कसोटीसाठी वाटप करण्यात आलेल्या आहेत. दहा वर्षानंतर या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतर करण्यात येईल असे सांगितले होते. परंतु अजूनही मूळ खंडकर बरोबर जमीन वर्ग एक झालेल्या नव्हत्या.

त्यामुळे मूळ खंडकर यांना जमिनीची खरेदी विक्री, कुटुंबिक हक्क, कर्ज यादी, कामिनी योग्य होत नव्हत्या. त्या उद्दिष्टाने अभिलेख आणि नोंदवही भोगवटादार वर्ग दोन रद्द करून वर्ग एक म्हणून तातडी नोंद करण्याची तरतूद करण्यात यावी म्हणून, आमदार मोहिते पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करीत खडकरी शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली होती.

तशा अशाचे पत्रही त्यांनी संबंधित विभागाला दिले होते. पण आता शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार राज्यातील खंडकरी शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या जमीन लवकर त्यांच्या नावावर होणार आहेत.

आता खंडकरी शेतकरी कसंत असलेल्या या जमिनीचा प्रकार बदलणार आहे. भोगवटा दोन मधून भोगवटा एक मध्ये रूपांतरित होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना जमिनीचा कब्जेदार होणार असून जमीन विक्री, हस्तांतर करता येणार आहे. राज्यातील सुमारे चार हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे

Leave a Comment