Loan Waiver : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान मध्ये सातत्याने बदल होत आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर गारपीट देखील झालेले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २५ नोव्हेंबर पासून अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. 25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. काही ठिकाणी गारपीट देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.
अवकाळी पावसामुळे आणि गारपटी मुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कधीही भरून निघणार नाही असे नुकसान केलेले आहेत. या पावसामुळे आणि अचानक झालेल्या गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब, केळी, रांगडा लाल कांदा, तुर, कापूस तसेच रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. यामुळे दुष्काळामुळे आधीच शेतकरी बाजार झाले होते. त्यांना मोठा फटका बसला होता. व त्यातच आलेले पीक सुद्धा अवकाळी पावसाने हिरावून घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास सुद्धा निसर्गाने पुन्हा हिसकावून घेतलेला दिसून येत आहे. खरे यावर्षी मान्सून काळात अर्थातच जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये खूपच कमी पाऊस झाला. कमी पाऊस त्यामुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे फारसे उत्पन्न मिळाले नाही. कापूस, सोयाबीन यासारख्या पिकांचे उत्पादनांमध्ये घट झाली आहेत. अशातच आता खरीप हंगामातील देखील पावसाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मारक ठरला आहे.
त्यामुळे आधी दुष्काळ आणि व अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेला बळीराजाला दिलासा देण्यासाठी मागणी केली जात आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मोठी मागणी केली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर पोस्ट करत ही मागणी केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील यावर्षी दुष्काळाची स्थिती आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी ही मोठी आणीबाणीची परिस्थिती या अशा कठीण काळामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांसाठी मदत आग्रही मागणी करायला हवी.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आदरणीय पवार साहेबांनी केंद्रे कृषिमंत्री असताना देशाच्या कोणत्याही भागात अशी परिस्थिती उद्भवली तर तिथे केंद्र सरकारचे पथक जाऊन पाहणे करत असे, आणि त्यानंतर तेथील शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली जात असे. आता देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करायला हवा.
यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी करण्याची मागणी करावी. तसेच शेतकऱ्यांना दिलासा देऊन त्याला पुन्हा उभा करण्याचे दृष्टीने जे काही करता येईल ते करायला हवे राज्य सरकारने शेतकऱ्याप्रती आपले कर्तव्य पार पाडण्याची वेळ आहे.
एकंदरीत आधी दुष्काळामुळे आणि आता अतिवृष्टीमुळे बदल झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन.शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी मोठी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यामुळे आता संकटात सापडल्या शेतकऱ्यांना शिंदे-फडवणीस-पवार सरकार भरिव मध्ये देत आहे. विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.