Weather update : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता; नवीन हवामान अंदाज पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather Forecast : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे. तर मध्यंतरी दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑगस्ट गुरुवारी महाराष्ट्र मध्ये अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ या भागातील काही जिल्ह्यांना थेट ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. यामध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील येलो अलर्ट देण्यात आलेला. चला तर जाणून घेऊया सविस्तर अंदाज. Maharashtra Weather Forecast

कोकणामध्ये हवामान खात्याने गुरुवारी जोरदार तर अति जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अपडेट नुसार, सकाळपासूनच वातावरण ढगाळ राहणार असून अधून मधून जोरदार पाऊस पडू शकतो. मुंबई आणि उपनगरामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. 14 ऑगस्ट साठी कोकणातील सर्व जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा कोल्हापूर या भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा येथे काही ठिकाणी मध्यम पाऊस तर पुणे आणि सोलापूर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

यासोबत उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर नाशिक जळगाव या जिल्ह्यांना येलो अलर्ट(Yellow Alert) देण्यात आलेला आहे. धुळे, नंदुरबार आणि नाशिक घाट परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील सर्वच आठ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यामध्ये बीड, जालना या ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, संभाजीनगर आणि नांदेड येथे जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भात देखील 14 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने काळजी घेणे आवश्यक आहे.

हे पण वाचा | या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याने दिला अंदाज

Leave a Comment