Youtube Earning : एका काळी फक्त टीव्हीवर दिसणारे कलाकार आणि सिनेमात झळकणारे अभिनेते हेच स्टार मानले जायचे. पण आता परिस्थिती पूर्ण बदलली आहे. मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून सामान्य माणूसही स्टार बनू लागला आहे. यामध्ये सर्वात मोठं योगदान आहे YouTube या प्लॅटफॉर्मचं. गावखेड्यापासून ते शहरांपर्यंत, सगळीकडे एकच चर्चा सुरू आहे “YouTubeवर व्हिडिओ टाकून पैसे कसे कमवतात?” Youtube Earning
आज YouTube हे फक्त मनोरंजनाचं माध्यम राहिलेलं नाही, तर लाखो तरुणांचा कमाईचा मोठा स्रोत बनलं आहे. पण प्रश्न असा पडतो की, नेमकं 1000 व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? या आकड्यांचा विचार केला, तर अनेकजण थक्क होऊन जातात आणि मग YouTube करणं ही एक खरी करीयर पर्याय वाटू लागतो. Youtube Earning
CPM आणि RPM म्हणजे नेमकं काय असतं?
YouTube वर कमाई ही दोन गोष्टींवर ठरते CPM (Cost Per Mille) आणि RPM (Revenue Per Mille). CPM म्हणजे 1000 व्ह्यूजवर जाहिरातदार किती पैसे देतो, तर RPM म्हणजे क्रिएटरला 1000 व्ह्यूजवरून नेमकी किती कमाई होते. यात फरक इतकाच की, जाहिरातदार देतो त्या पैशांतून YouTube आणि सरकार कर घेतात, आणि उरलेली रक्कम क्रिएटरला मिळते.
भारतामधील कमाई किती होते?
भारतात 1000 व्ह्यूजवर साधारणतः 15 ते 80 रुपये मिळतात. हा दर व्हिडिओच्या प्रकारावर, त्यातल्या जाहिरातींच्या संख्येवर आणि प्रेक्षकांनी त्या जाहिराती पाहिल्या की नाही यावर अवलंबून असतो. शहरांमध्ये राहणाऱ्या आणि इंग्रजीमध्ये व्हिडिओ बनवणाऱ्या क्रिएटर्सना थोडा अधिक फायदा होतो, कारण इंग्रजी भाषेत CPM थोडं जास्त असतं.
शॉर्ट्स आणि लांब व्हिडिओंचा फरक काय?
सध्या YouTube Shorts खूप चर्चेत आहेत. पण यावरून होणारी कमाई फारच कमी आहे. एक लाख व्ह्यूजवर सुमारे $1 ते $3 (80 ते 250 रुपये) मिळतात. याउलट 8 मिनिटांपेक्षा जास्त लांबीचे व्हिडिओ असतील, तर त्यात अनेक जाहिराती लावता येतात आणि त्यामुळे कमाईचा आकडा झपाट्याने वाढतो.
विद्यार्थ्यांसाठी, बेरोजगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठीही संधी
सध्या गावाकडील अनेक तरुण YouTube चॅनेल सुरू करून शिक्षण, शेती, स्वयंपाक, गावातील गमती-जमती दाखवणारे व्हिडिओ टाकून चांगली कमाई करत आहेत. एकदा का चॅनेल मोनेटाईज झालं की, त्यातून मिळणारे पैसे बँकेत थेट जमा होतात. त्यासाठी लागतात 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 वॉच तास, किंवा 90 दिवसांत 1 कोटी Shorts व्ह्यूज.
टेक, फायनान्स, बिझनेस – यांच्यात जास्त कमाई
तुमचा विषय टेक्नॉलॉजी, बिझनेस, फायनान्स, आरोग्य किंवा रिअल इस्टेटसारखा आहे का? तर तुमचं CPM इतरांपेक्षा जास्त मिळू शकतं. या क्षेत्रात 1000 व्ह्यूजवर 100 ते 500 रुपयांची कमाई सहज शक्य आहे. म्हणूनच हे विषय निवडणारे लोक कमाईत आघाडीवर असतात.
जास्त कमाई कशी करायची?
YouTube फक्त जाहिराती देतो, पण खरी कमाई होते स्पॉन्सरशिप्स, एफिलिएट मार्केटिंग, ब्रँड डील्स, सुपर चॅट आणि चॅनेल सबस्क्रिप्शन यामधून. एकदा का चॅनेल लोकप्रिय झालं, की अनेक कंपन्या स्वतःहून संपर्क साधतात. काही यूट्यूबर्स फक्त एका स्पॉन्सरशिपसाठी लाखो रुपये घेतात.
अखेर विचार करा हा तुमचाही मार्ग असू शकतो!
आज YouTubeवर हजारो मराठी तरुणांनी नशिब आजमावलं आणि यशस्वी झाले. गावातून, मोबाईलवर व्हिडिओ शूट करून, अनुभव शेअर करत करत त्यांनी आज लाखोंची कमाई सुरू केलीय. तुम्हीही विचार करू शकता – तुमचं काहीतरी खास आहे का, जे जगाला दाखवता येईल? मग थांबू नका आजपासूनच तयारी सुरू करा!
(Disclaimer : ही माहिती वेगवेगळ्या माध्यमांच्या आधारे आहे, कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी व या बातमीवरती विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.)
हे पण वाचा | शिक्षित आहात पण व्यवसाय कोणता करावा? फक्त 5000 रुपये गुंतवा आणि सुरू करा ‘हा’ व्यवसाय