Mazi Ladki Bahin Yojana: मागल्या वर्षाच्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्याचे एकूण दहा हजार पाचशे रुपये महिलांना देण्यात आले आहे. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आमची सत्ता आल्यानंतर 1500 रुपया ऐवजी 2100 रुपये देऊन असे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. मात्र आता निवडणुका होऊन जवळपास तीन-चार महिने झाले आहेत. तरीदेखील 2100 रुपयाची अंमलबजावणी अजून झाली नाही. त्यामुळे लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? असा सवाल महिलांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
अशातच याबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. राज्यात एक मार्च 2025 रोजी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा करू शकतात. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीचे लक्ष एक मार्च 2024 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे लागले आहे. Mazi Ladki Bahin Yojana
यापूर्वीही महायुतीच्या अनेक मोठ्या नेत्यांनी अर्थसंकल्पानंतर महिलांना एक विषय रुपये मिळतील अशी आश्वासने दिली आहेत. असं असलं तरी महिला व बाल विकास विभागाने अद्याप 2100 रुपयासाठी अर्थ मंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव पाठवला नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता विविध चर्चा प्रसार माध्यमांमध्ये होत आहे. मार्च महिन्यात तरी लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का याकडे सर्व महिलांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
दरम्यान या योजनेची पडताळणी वेगाने सुरू आहे. आतापर्यंत पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला दोन लाख तीस हजार एवढे आहेत. तर 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार एवढी आहे. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी गाडी असलेल्या व नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला एक लाख साठ हजार एवढ्या आहेत. अशाप्रकारे एकूण पाच लाख महिलांना या योजनेतून अपात्र ठरविण्यात आले आहे.
या लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आले असल्या तरी या महिलांवर कोणतीही कारवाई होणार नाही किंवा त्यांच्या कोणकोणत्याही पैसे परत घेतले जाणार नाहीत. फक्त या योजनेतून त्यांना यापुढे एकही रुपया मिळणार नाही. असे सरकारने स्पष्ट केले आहे. अपात्र महिलांकडून कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला निधी परत घेणे उचित नाही. म्हणूनच कोणत्याही लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत देण्यात आलेला लाभ परत घेतला जाणार नाही. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्य व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा