Mazi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारतर्फे दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्य सरकारने मागील वर्षी जुलै महिन्यापासून ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत सात हप्त्याचे एकूण महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. यानंतर सध्या फेब्रुवारी महिना सुरू आहे, लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 20 तारखेच्या आसपास लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान याबाबत सरकारने अधिकृत तारीख जाहीर केली नाही. दरम्यान या योजनेची छाननी सुरू आहे. छाननी दरम्यान अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींना या योजनेतून बाद केले जात आहे. या लेखामध्ये आपण कोणत्या लाडक्या बहिणी अपात्र झाले आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.
हे पण वाचा | हैरान करणारी आकडेवारी; लाडकी बहीण योजनेतून एवढ्या महिला अपात्र? पहा सविस्तर..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक अपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. खोटी कागदपत्रे आणि चुकीची माहिती सादर करून या योजनेचा लाभ घेतला आहे. आशा लाभार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्य सरकारने काही दिवसापूर्वी दिले आहेत. अशातच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक ट्विट करून लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. Mazi Ladki Bahin Yojana
काय म्हणाल्या मंत्री अदिती तटकरे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत अनेक महिलांनी लाभ घेतला आहे. त्याचबरोबर अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे आणि या योजनेतून स्वतःहून नाव वगळण्यासाठी अर्ज देखील केले आहेत. अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालील प्रमाणे आहे.
हे पण वाचा | लडकी बहीण योजनेबाबत आदिती तटकरे यांनी दिली मोठी अपडेट! या महिलांचे टेन्शन वाढणार?
लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असणारे महिलांची संख्या दोन लाख तीस हजार एवढी आहे. वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिलांची संख्या एक लाख दहा हजार एवढी आहे. कुटुंबाच्या सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन असलेल व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या असलेल्या महिलांची संख्या एक लाख 60 हजार एवढी आहे. अशाप्रकारे एकूण पाच लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. या सर्व अपात्र महिलांना यापुढे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेअंतर्गत एक रुपयाही दिला जाणार नाही. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाकडून या महिलांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
त्याचबरोबर आदिती तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिलेला लाभ कोणत्याही महिलांकडून परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. त्याचबरोबर कल्याणकारी राज्याची कल्पना घेऊन लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा केलेला निधी परत वापस घेणे उचित ठरणार नाही. म्हणून कोणत्याही लाभार्थ्यांकडून आतापर्यंत दिलेला निधी वापस घेतला जाणार नाही याची सर्व महिलांनी नोंद घ्यावी.
हे पण वाचा | या भागातील 22 हजार लाडक्या बहिणी योजनेतून अपात्र; छाननी वेगात सुरू..
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?
राज्याच्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीच्या मोठ्या नेत्यांनी प्रचार सभेत लाडक्या बहिणींना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ करून 1500 रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. परंतु राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतरही लाडक्या बहिणींना अजून 2100 रुपयाचा एकही हप्ता मिळाला नाही. त्यामुळे महायुतीने दिलेले हे वचन कधी पूर्ण होणार याकडे सर्व राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे. अनेक वेळा महायुतीच्या मोठ्या नेत्यांना याबाबत प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत. त्यावेळी मिळालेल्या उत्तरातून हे स्पष्ट होत आहे की अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे.
अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा
1 thought on “या लाडक्या बहिणींना योजनेतून अपात्र; आता यापुढे या महिलांना 1 रुपयाही मिळणार नाही?”