HSC SSC Board Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळातर्फे घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता बारावीच्या परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याचबरोबर माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च दरम्यान होणार आहेत. कोणत्याही परीक्षा केंद्रावर कॉफीचा गैरप्रकार घडल्यास गैरप्रकार करणारे किंवा त्यांना मदत करणारे तसेच प्रत्यक्ष गैरप्रकार करणाऱ्या वर आजामीन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आशा इशारा राज्य मंडळाच्या सचिव डॉक्टर माधुरी सावरकर यांनी दिलेला आहे.
मुख्यमंत्री यांच्या शंभर दिवसाच्या कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता बारावी व दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी महाराष्ट्र शासन व महामंडळ मोठे प्रयत्न करत आहे. यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्रधान सचिव आणि शिक्षण आयुक्ताच्या उपस्थितीत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी सर्व पोलीस आयुक्त पोलीस अधिक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची ऑनलाईन पद्धतीने बैठक घेण्यात आली आहे.
या बैठकीदरम्यान मुख्य सचिव यांनी या वर्षी होणाऱ्या बारावी व दहावीच्या परीक्षा कॉफीमुक्त करण्यासाठी राज्यभर अभियान सुरू करण्याचे आव्हान केले आहे. त्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी करण्यात आले आहेत. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासना मार्फत ड्रोन कॅमेरे द्वारे परीक्षा केंद्राची निगराणी केली जाणार आहे. परीक्षा सुरू होण्याअगोदर एक दिवस आधी परीक्षा केंद्रावर आवश्यक भौतिक सर्व सुविधा आहेत का नाही? याची जिल्हा प्रशासनाकडून तपासणी केली जाणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ लाईव्ह करण्यात येणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कधी जमा होणार? शेवटी तारीख आली समोर जाणून घ्या..
जिल्ह्यातील सर्व विभागाचे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साह्याने कॉफी मुक्त परीक्षा होण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर भरारी पथक व बैठी पथक उपलब्ध असणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेला केंद्र संचालक पर्यवेक्षक व परीक्षेची संबंधित घटकांची फेशियल रिकगनायझेशन यंत्रणा द्वारे तपासणी करण्यात येणार आहे. तसेच विभागीय मंडळामार्फत परीक्षेची संबंधित सर्व घटकांना अधिकृत ओळखपत्र देण्यात येणार आहे. HSC SSC Board Exam
दहावी बारावीच्या परीक्षा केंद्रापासून 500 मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र गेर व्यवहार प्रतिबंधक कायदा 1982 या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे व कोणत्याही परीक्षा केंद्रावर कुठलाही गैरप्रकार घडल्यास, गैरप्रकार करणारे तसेच त्यास मदत करणारे व प्रत्यक्ष गैरवर्तन करणाऱ्या वर अजामीन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वरील सर्व उपयोजना करण्यात येणारा असून याची सर्व विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षक वर्गाने नोंद घ्यावी.