Whatsapp update : सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून व्हाट्सअप ॲप ची ओळख आहे. व्हाट्सअप ची दिवसेंदिवस वाढत चाललेली प्रसिद्ध पाहून व्हाट्सअप त्यांच्या युजर साठी नवीन नवीन फीचर्स आणत असते. व्हाट्सअप त्यांच्या तंत्रज्ञानामध्ये दिवसेंदिवस बदल करत आहे.
ते त्यांच्या युजरांना सातत्याने स्वतःला अपडेट करू पाहत आहे. गेल्या बऱ्याच काळापासून पाय घट्ट रोऊन ते मार्केटमध्ये उभा आहे. जगात दर दिवशी अब्ज संख्येने युजर्स हे ॲप वापरत आहेत.
मेसेजिंग करणे फोटो आणि व्हिडिओ शेअर करने, किंबहुना पैशांची आणि विविध डॉक्युमेंट ची देवाण घेवाण करणे, अशा अनेक कामासाठी हे ॲप वापरले जात आहे. व्हाट्सअप ॲप वापरणारे अनेक मंडळी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ ॲप मधील इतर माहितीचे बॅकअप गूगल ॲप मध्ये सेव करतात. पण आता हीच बॅकअप सुविधा फार काळ मोफत वापरता येणार नाही. थोडक्यात आता ही सुविधा वापरण्यासाठी युजरने पैसे मोजावे लागणार आहेत.
व्हाट्सअप ॲप मध्ये नवे आणि मोठे बदल !
2023 च्या अखेरीस गुगल सपोर्ट करून महत्त्वाची माहिती देण्यात आली. whatsapp ॲप मध्ये येत्या काळात काही महत्त्वाचे बदल होणार असल्याचे सांगितले होते.
त्यानुसार आता युजर्स गुगल ड्राईव्ह वर मोफत स्वरूपात कोणतीही माहिती अनलिमिटेड सेव करू शकत नाही. स्पेस पूर्ण झाल्यानंतर त्यांना काही डेटा डिलीट करावा लागणार आहे. व्हाट्सअप कडून ही नवी अपडेट लागू करण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे.
आता ही सेवा मोफत वापरता येणार नाही, यासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत. गुगल ड्राईव्ह वर युजर्स साधारण १५ जीबी क्लाऊड डेटा मिळतो. सध्या व्हाट्सअप कडून कितीही बॅकअप केला तरी १५ जीबी डेटा ला धक्काही पोहोचत नाही. पण नव्या वर्षात हा नियम बदलणार आहे. पण नेमका कधी हे मात्र अद्याप पष्ट करण्यात आलेले नाही.
थोडक्यात जर व्हाट्सअप युजर्स अधिक बॅकअप क्लाऊड स्टोरेज मध्ये सेव करत आहेत. तर तो 15 जीबी डेटा मोजला जाणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला डेटा मॅनेज करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.