Weather Forecast : अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पठाण निर्माण झाले नाही राज्यसह भारतामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले आहे अनेक भागांमध्ये मेघा गर्जनाचा पाऊस हजरी लावल्याचे पहिला मिळत आहे.
राज्यामध्ये वातावरणामध्ये बदल पहिला मिळत आहे. ऑक्टोबर महिना पूर्ण कोरडा गेल्याने राज्यांमध्ये दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यसह देशभरामध्ये अवकाळी पावसाने हजरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून राज्यांमध्ये गरजेनुसार पाऊस हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
तर राज्यात काही भागांमध्ये गुलाबी थंडीची चाहूल पाहायला मिळत आहे. नंबर महिन्याच्या शेवटी थंडीचा जोड वाढणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
अवकाळी पावसाला सुरुवात
राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडल्याचा पहिला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून, पुढील 24 तासांमध्ये राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. आजही कोकण व मध्य महाराष्ट्र पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोल्हापूर रत्नागिरी सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अवकाळी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तसेच मुंबई सह पुणे सातारा आणि कोकण किनारपट्टी भागामध्ये काही ठिकाणी टिळक पाऊस झाला आहे. तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाला आहे दुपारी मात्र उन्हाचा चटका बसत होता.
थंडीचा जोर वाढलाय ?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार देशांमधील काही भागात पाऊस व वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम हिमालियन भागामध्ये बर्फ वृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. दिल्लीतील तापमान घसरण्यास सुरुवात झाली असून थंडीचा जो वाढू लागला आहे. दिवाळीनंतर पुन्हा एकदा प्रदूषणात वाढ झाली आहे.